पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान दरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी(14 जानेवारी) हॅमीलटनच्या मैदानावर खेळला गेला. हा सामना न्यूझीलंडने 21 धावांनी जिंकला. सामन्यात डॅरल मिचेलने मारलेल्या षटकारानंतर बाबर आझम याने कॅमेरामॅनविषयी दाखवलेल्या दिलदारपणाची सध्या सोशल मीडीयावर खुप स्तुती होत आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या सामन्यात न्युझीलंडने विजय मिळवला. मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकूण गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार शाहीन शाह अफ्रिदीचा हा निर्णय न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फोल ठरवला. सामनावीर फिन ऍलेनने जबरदस्त फटकेबाजी करत सामन्याची सुरवात केली. पहिल्या विकेटनंतरही मैदानात चौकार षटकारांचा पाऊस काही थांबला नाही. कर्णधार केन विलियम्सन रिटायर हर्ट झाल्यामूळे त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या डॅरल मिचेलने फटकेबाजीने सुरवात केली. त्याने त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर झणझणीत षटकार ठोकला. हा चेंडू थेट मैदानाबाहेर असलेल्या कॅमेरावर जाऊन पडला. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. (nz-vs-pak-babar-azam-camerman-shake-hands-after-mitchells-six-damages-camera)
बाबरच्या दिलदारपणाच सोशल मिडीयावर होतय कौतुक.
सामन्याच्या 11व्या षटकात डॅरन मिचेलने अब्बास आफ्रिदीला मारलेला षटकार थेट कॅमेराला जाऊन धडकला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की चेंडू कॅमरेला लागल्यानंतर कॅमरामन भलताच रागवला. त्याने लगेच आपले हेडफोन फेकून दिले आणि कॅमरासोडून निघून जायला लागला. यानंतर तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला आवाज दिला आणि त्याची विचारपूस केली. तेव्हा आपल्याला चेंडू लागला नाही तर कॅमेरा लागला असे त्याने दाखवले. यानंतर बाबरने त्याच्याशी हस्तांदोलन केले. क्रिकेटच्या चाहत्यांकडून आता सोशल मिडीयावर बाबरने दाखवलेल्या या माणुसकीच कौतुक होत आहे.
Ball hitting on camera 🎥
Babar Azam asking from cameraman that is he ok and a high five 🙌 ❤️
What a great gesture from KING 👑 #PAKvNZ #PAKvsNZ #BabarAzam pic.twitter.com/xl749SzK9w
— Sami Nadeem (@Sami_ullah_1234) January 14, 2024
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला 194 धावा करण्यात यश आले. 195 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ३ चेंडू शिल्लक असतानाच 173 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंड हा सामना 21 धावांनी जिंकले. पाच सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडला 2-0 ने आघाडी मिळाली.
महत्वाच्या बातम्या
भारतासाठी ‘या’ दोघांनी ठोकली सर्वात वेगवान T20I शतकं, दोघांनी काढला श्रीलंकन गोलंदाजांचा घाम
VIDEO । विराटने सांगितला जोकोविचकडून आलेल्या पहिल्या मेसेजचा किस्सा, भारतीय दिग्गजाला नव्हता बसला विश्वास