---Advertisement---

लॅथमच्या चपळाईला सलाम! फलंदाजाने शॉट मारण्यापूर्वीच बांधला चेंडूचा अंदाज आणि टिपला अद्भुत झेल

On: रविवार, फेब्रुवारी 20, 2022 8:44 PM
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका (NZ VS SA test series) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने मोठा विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिका संघ तब्बल १ डाव आणि २७६ धावांनी विजयी ठरला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचे प्रदर्शन चांगले राहिलेच, परंतु त्यांचा कर्णधार टॉम लॅथम (tom latham) याचे खास कौतुक केले जात आहे. लॅथमने सामन्याच्या पहिल्या डावात एक अविश्वसनीय झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

उभय संघातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात हा अप्रतिम झेल चाहत्यांना पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या टॅम लॅथमने हा झेल घेतला आणि दक्षिण अफ्रिकेसाठी शेवटी खेळपट्टीवर आलेल्या डुआन ओलिवियर (duanne olivier) याला तंबूत परतावे लागले. लॅथमने जरी हा झेल घेतला असला, तरी ही कामगिरी वाटते तेवढी सोपी नव्हती.

दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजीवेळी ५० व्या षटकात फिरकी गोलंदाज नील वॅगनर गोलंदाजीसाठी आला होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर ओलिवियरने खाली बसून स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण लॅथमने चपळाई दाखवून झेल घेतला आणि फलंदाजाने विकेट गमावली.

फलंदाज ओलिवियर शॉट खेळण्याच्या तयारीतच होता, तोपर्यंतच लॅथमने अंदाज बांधला आणि आधीच त्या दिशेने पुढे पाऊल टाकू लागला. लॅथमने ऑलिवियरचा हा झेल एका हाताने घेतला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. लॅथमने झेल घेतल्यानंतर फलंदाजालाही यावर विश्वास बसत नव्हता, त्याचसोबत यष्टीरक्षकही त्याची चपळाई पाहून हैराण झाला होता.

दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडचे नाणेफेक जिंकली आणि दक्षिण अफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या डावात दक्षिण अफ्रिका संघ अवघ्या ९५ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात तब्बल ४८२ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर दक्षिण अफ्रिका संघ दुसऱ्या डावात देखील अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही आणि १११ धावा करून सर्वबाद झाला. परिणामी न्यूझीलंडने एक डाव आणि २७६ धावांनी विजय मिळवला. उभय संघातील दुसरा कसोटी सामना २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

रोहितचा उत्तराधिकारी म्हणून पंत, केएल आणि बुमराहचा पर्याय, पण कोण होऊ शकतो चांगला कर्णधार?

बुमराहला मागे टाकत चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

शाहरुखने रणजीमध्ये केली टी२० स्टाईल धुलाई! इतक्या चेंडूत कुटल्या १९४ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---