---Advertisement---

NZvIND 2nd ODI: संजू पुन्हा बाकावर! चाहत्यांनी म्हटले, ‘ 15 धावा करणारा आता आणि…’

On: रविवार, नोव्हेंबर 27, 2022 9:43 AM
Sanju Samson
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND) यांच्यात रविवारी (27 नोव्हेंबर) मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. हॅमिल्टन येथे खेळला जाणारा हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत यजमान संघाने पुन्हा एकदा बाजी मारली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल झाले, ज्यातील एक बदल पाहून चाहत्यांचा राग अनावर झाला.

संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शार्दुल ठाकुर (Shardul Thakur)हे दोघे बाकावर बसले, तर त्यांच्याजागी दीपक हुडा आणि दीपक चाहर यांना संघात घेतले. यानंतर मात्र सोशल मीडियावर वादाला सुरूवात झाली. सॅमसनला बाहेर केल्याने चाहत्यांनी राग व्यक्त केला. टी20 मालिकेवेळीही त्याला एकाही सामन्यात संधी दिली नाही आणि पहिल्या वनडेत चांगली कामगिरी करूनसुद्धा दुसऱ्या वनडेतून त्याला वगळले.

पंतला संघात घेतल्याने चाहत्यांनी राग व्यक्त केला. अनेकांनी म्हटले, ‘पहिल्या सामन्यात 23 चेंडूत 15 धावा करणारा पंत आत आणि 38 चेंडूत 36 धावा करणारा सॅमसन बाहेर, हा अन्याय का?’

पहिल्या सामन्यात जेव्हा शुबमन गिल (Shubman Gill) आणि कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) बाद झाले तेव्हा भारताचा डाव थोडा अडचणीत आला होता, कारण पंत आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही लवकरच तंबूत परतले होते. त्यानंतर श्रेयर अय्यर आणि सॅमसन यांनी पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली होती. NZvIND 2nd ODI Sanju Samson is not part of playing eleven & Fans Reactions on That

पहिल्या सामन्यात भारताने 7 विकेट्स गमावत 306 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा विकेटकीपर-फलंदाज टॉम लॅथम याने नाबाद 145 आणि कर्णधार केन विलियम्सन याने नाबाद 94 धावा केल्या. यामुळे यजमानांनी हा सामना 17 चेंडू आणि 7 विकेट्स शिल्लक राखत जिंकला. यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लहानपणी अनेकवेळा रॅगिंग झालेला तरीही न खचता पुढे भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक झालेला रैना
गजब तमाशा! पाऊस तर नव्हताच, मग का थांबवण्यात आला अंतिम सामना? घडला प्रकार व्हिडिओत कैद

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---