न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND) यांच्यात पहिला वनडे सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताचा कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली. यावेळी गिलने विक्रम केला आहे, जो रोहित शर्मा, विराट कोहली यांना देखील जमला नाही.
शुबमन गिल (Shubman Gill) याने न्यूझीलंड विरुद्ध 63 चेंडूत 50 धावा केल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि तीन षटकार देखील मारले. ही खेळी करताच तो भारताकडून 13 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या यादीत आधी नवज्योत सिंग सिद्धू होते. त्यांनी 558 धावा केल्या, दुसरीकडे गिलने 13 सामन्यांच्या 13 डावांमध्ये 57.18च्या सरासरीने 629 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर गिलने 2022मध्ये आतापर्यंत वनडे क्रिकेटचे 10 डाव खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 64(53), 43(49), 98*(98), 82*(72), 33(34), 130(97), 3(7), 28(26), 49(57) आणि 50(65) अशा धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी पाहून 2023मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या भारतीय संघात त्याला निवडले गेले तर त्याच आश्चर्यासारखे काहीच नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गिलने शिखर धवन याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. धवनही 77 चेंडूत 13 चौकाराच्या साहाय्याने 72 धावा करत बाद झाला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील हा पहिला सामना खेळला गेला.
Fourth ODI half-century for Shubman Gill ????
Watch the #NZvIND ODI series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) ????
???? Scorecard: https://t.co/KsjLsSQ2eQ pic.twitter.com/9GKwgpDbjW
— ICC (@ICC) November 25, 2022
धवन-गिलनंतर भारताचा डाव थोडा संथ झाला. त्यातच सूर्यकुमार यादव (4) आणि रिषभ पंत (15) धावा करत तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर संजू सॅमसन याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली आणि भारताला 200च्या पार नेले. NZvIND first odi Shubman Gill Fifty and Most ODI runs for India After 13 Innings
भारतासाठी सर्वाधिक वनडे धावा (13 डावांनंतर)
629 – शुभमन गिल
558 – नवज्योत सिंग सिद्धू
536 – शिखर धवन
531 – श्रेयस अय्यर
502 – केदार जाधव
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: दिनेश कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत! लिहिले ‘विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले….’
दुर्दैवी! मैदानावर क्रिकेट खेळताना दुखापती झाल्याने निधन झालेले 3 खेळाडू






