न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND) यांच्यात पहिला वनडे सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताचा कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला उत्तम सुरूवात करून दिली. श्रेयस अय्यर यानेही अर्धशतकी खेळी केली. तसेच वॉशिंग्टन सुंदर याने फिनिशरची भुमिका उत्तम निभावली. त्याने 16 चेंडूत 3 चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने 37 धावा केल्या. यामुळे भारताने 50 षटकांत 7 विकेट्स गमावत 306 धावसंख्या उभारली.
या सामन्यात भारताकडून कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिली यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी रचली. गिल 63 चेंडूत 50 धावा करत बाद झाला. त्याने एक चौकार आणि तीन षटकार खेचले. धवनही 77 चेंडूत 13 चौकारांच्या साहाय्याने 72 धावा करत तंबूत परतला.
धवन-गिलनंतर भारताचा डाव थोडा संथ झाला. त्यातच सूर्यकुमार यादव (4) आणि रिषभ पंत (15) धावा करत तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर याने संजू सॅमसन याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली आणि भारताला 200च्या पार नेले. अय्यर 76 चेंडूत 80 धावा करत टीम साउदी याचा बळी ठरला. सॅमसनने 38 चेंडूत 36 धावा केल्या.
Innings Break!
A solid batting display from #TeamIndia! 💪 💪
8⃣0⃣ for @ShreyasIyer15
7⃣2⃣ for captain @SDhawan25
5⃣0⃣ for @ShubmanGillOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/jmCUSLdeFf #NZvIND pic.twitter.com/jp1k1EYqNL
— BCCI (@BCCI) November 25, 2022
अय्यर-सुंदर यांनी सहाव्या विकेटसाठी 22 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली आणि भारताने 300 पर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडकडून साउदी आणि लॉकी फर्ग्युसन अधिक विकेट्स घेण्यात यशस्वी ठरले. साउदीने10 षटके टाकताना 73 धावा देत 3 आणि फर्ग्युसनने 10 षटकात 59 धावा देत गुल, सूर्यकुमार आणि पंत यांना बाद केले. ऍडम मिल्ने याने 10 षटकात 67 धावा देत एक विकेट घेतली.
भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत उत्तम धावसंख्या रचली असून आता भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतील याकडे लक्ष असेल. संघात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: दिनेश कार्तिकने दिले निवृत्तीचे संकेत! लिहिले ‘विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले….’
NZvIND: पहिल्या वनडेत भारताची धमाकेदार सुरूवात! शिखर धवननंतर शुबमन गिलचीही फिफ्टी