राॅस टेलर हा न्यूझीलंडचा महान फलंदाज आहे. रविवारी (९ जानेवारी) तो त्याचा आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात उतरला. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा राॅस टेलर भावुक झालेला दिेसला आणि त्याला अश्रू अनावर झाले.
बांग्लादेशच्या दृष्टीकोनातून हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना बांग्लादेशने जिंकला. ही कसोटी इतिहासातील पहिलीच वेळ होती, जेव्हा बांगलादेशने न्यूझीलंडमध्ये एखादा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघ ०-१ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामना निर्णायक आहे. हा सामना जिंकून बांगदेशला इतिहास रचण्याची संधी आहे, तर न्यूझीलंड मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे रॉस टेलरसाठी ही मालिका खास आहे, कारण या मालिकेपूर्वीच रॉस टेलरने स्पष्ट केले होते की, तो मायदेशातील उन्हाळी हंगाम संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. त्यामुळे त्याच्यासाठी बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका कसोटी कारकिर्दीतील अखेरची कसोटी मालिका ठरली आहे. पुढील दोन महिन्यात तो वनडे आणि टी२० क्रिकेटमधूनही निवृत्त होईल. त्यामुळे अखेरच्या कसोटीसाठी मैदानात उतरल्यानंतर टेलरला अश्रू अनावर झाले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे.
https://twitter.com/4sacinom/status/1479943925712539661
दरम्यान, ख्राईस्टचर्च येथे होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर १ बाद ३४९ धावा केल्या आहेत.
रॉस टेलरने हा जगातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत १११ कसोटी सामने खेळले असून ७६५५ धावा केल्या आहेत. १०२ टी२० मध्ये १९०१ धावा त्याने केल्या आहेत, तसेच त्याने २३३ एकदिवसीय सामने खेळले आहेत व ८५८१ धावा केल्या आहेत. याशिवाय तो तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रकारात १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला
केपटाऊन कसोटीत भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ अविस्मरणीय कामगिरी, ज्या आजही विसरणे कठीण
सिडनीमध्ये स्मिथचाच बोलबाला! केलीये ‘अशी’ अचाट कामगिरी