न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शुक्रवारी (१२ ऑगस्ट) टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. जमैका येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर ९० धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात वेस्ट इंडिजकडून २५ वर्षीय वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉय याने प्रभावी प्रदर्शन केले. त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही विस्फोटक खेळ दाखवला. यासह त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात (New Zealand vs West Indies) न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. या डावात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी निराशा केली. परंतु या निराशेच्या लहरेत मॅकॉयने (Obed McCoy) चांगल्या प्रदर्शनाचा नमुना सादर केला. त्याने ४ षटके फेकताना ४० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. सलामीवीर मार्टिन गप्टिल, कर्णधार केन विलियम्सन आणि ग्लेन फिलिप्स यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या.
गोलंदाजीनंतर फलंदाजीतही त्याने छाप सोडली. अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने फलंदाजीत पारंगत असलेल्या खेळाडूसारखी कामगिरी केली. १५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद २३ धावांची खेळी केली. तो या सामन्यात वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. या खेळीसह तो अकराव्या क्रमांकावर टी२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळी करणारा फलंदाज बनला आहे. ख्रिस एमपोफू, जोश लिटल, मुशफिकुर रेहमान यांना मागे टाकत त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
विशेष म्हणजे, हाच मॅकॉय भारतीय संघालाही नडला होता. मागील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने ६ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला होता.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ११व्या क्रमांकावर फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या (पूर्ण सदस्य):
२३* – ओबेड मॅकॉय विरुद्ध न्यूझीलंड, २०२२
१७* – ख्रिस मपोफू विरुद्ध नेदरलँड, २०१९
१५* – जोश लिटल विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०२१
१५ – मुस्तफिझूर रेहमान विरुद्ध अफगाणिस्तान, २०१९
दरम्यान दुसऱ्या टी२० सामन्यात (Second T20I Match) प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ९ बाद १२५ धावाच करू शकला. परिणामी न्यूझीलंडने तब्बल ९० धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. हा न्यूझीलंड संघाचा टी२० क्रिकेटमधील धावांच्या बाबतीत चौथा सर्वात मोठा विजय होता.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारत जगातील सर्वात मजबूत संघ, पण आम्हीही…’, वनडे मालिकेपूर्वी झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकाची हुंकार
जेव्हा पाकिस्तानी यष्टीरक्षकाला मारायला निघालेला गौतम गंभीर, पण कॅप्टनकुलने शांत केलेले वातावरण
अबकी बार, पाकिस्तान की हार! ऑसी दिग्गजाच्या मते आशिया चषकातील महामुकाबला भारतच जिंकणार




