---Advertisement---

पदार्पणातच चमकला राजस्थानचा पठ्ठ्या; कोलकाताच्या फलंदाजाची विकेट घेताच केले ‘पुष्पा’ सेलिब्रेशन, VIDEO VIRAL

On: मंगळवार, एप्रिल 19, 2022 12:46 AM
Obed-McCoy
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या ३०व्या सामन्यात सोमवारी (दि. १८ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ धावांनी धूळ चारली. यासह राजस्थान संघाने हंगामातील चौथा विजय मिळवला. राजस्थानच्या विजयाचा हिरो युझवेंद्र चहल ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यादरम्यान राजस्थानला विजयासाठी शेवटच्या षटकात फक्त २ विकेटची आवश्यकता होती. यावेळी राजस्थानच्या गोलंदाजाने विकेट घेतल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने यावेळी विकेट घेताच पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले. यादरम्यानचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने (Rajasthan Royals) ५ विकेट्स गमावत २१७ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाला शेवटच्या षटकात ११ धावांची आवश्यकता होती. यावेळी राजस्थानकडून आयपीएल पदार्पण करणारा ओबेद मॅककॉय गोलंदाजी करत होता. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मोठ्या विश्वासाने मॅककॉयवर ही जबाबदारी सोपवली होती. त्यानेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.

कोलकाताकडून या षटकात शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) आणि उमेश यादव (Umesh Yadav) फलंदाजी करत होते. स्ट्राईकला जॅक्सन होता. षटकातील पहिला चेंडू खेळताना जॅक्सनने २ धावा घेतल्या. मात्र, दुसरा चेंडू मारताना त्याने थेट प्रसिद्ध कृष्णाच्या हातात झेल दिला आणि तो झेलबाद झाला. यानंतर मॅककॉयने पुष्पा सेलिब्रेशन करत विकेटचा आनंद लुटला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडिओ-

https://twitter.com/impremvj/status/1516115736267456512?s=21&t=IMd9nMctTe_sdiQRjZVMOA

https://twitter.com/Sridatta_bunny/status/1516116617733632001

यानंतर संघाला ४ चेंडूत ९ धावांची आवश्यकता होती. उमेश यादव चांगल्या लयीत होता. मात्र, मॅककॉयने उमेशचा त्रिफळा उडवला आणि पराभवाच्या तोंडातून सामना आपल्या संघाला जिंकून दिला.

राजस्थानच्या विजयात जोस बटलर आणि युझवेंद्र चहल यांनीही मोलाचे योगदान दिले. बटलरने फलंदाजी करताना शतक झळकावत संघाला २०० धावसंख्येचा आकडा पार करण्यात मदत केली. दुसरीकडे, चहलने हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत थेट दुसरे स्थान गाठले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

बटलरचं शतक अन् चहलच्या ‘पंचका’ने उचलला राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा; कोलकाताला चारली ७ विकेट्सने धूळ

जे सॅमसन अन् वॉटसनला जमलं नाही, ते राजस्थानसाठी बटलरने करून दाखवलं! पाहा पठ्ठ्याची खास कामगिरी

कोलकाताच्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध बटलरचा खणखणीत षटकार; १०० मीटर दूर जाऊन पडला चेंडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---