---Advertisement---

ओबेद मॅकॉयने ‘हिला डाला’! भारताविरुद्ध सामनावीर बनल्यानंतर दिली हृदयास भिडणारी प्रतिक्रिया

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 11:29 AM
Obed-McCoy
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघासाठी सोमवारचा (०२ ऑगस्ट) दिवस चांगला राहिला नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला या दिवशी पहिल्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. सेंट किट्स येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा सर्वात मोठा शिल्पकार राहिला वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉय. मॅकॉयने या सामन्यात ६ विकेट्स घेतल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर मॅकॉयने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. 

२५ वर्षीय वेगवान गोलंदाज मॅकॉयने (Obed McCoy) या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना १७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या ६ विकेट्समध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत सलामीवीर सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांचा समावेश होता. त्याच्या या धारदार गोलंदाजीमुळे भारतीय संघ १९.४ षटकातच १३८ धावांवर सर्वबाद झाला. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

आपल्याला मिळालेला हा पुरस्कार (Man Of The Match Award) त्याने आपल्या आईला समर्पित केला आहे. मॅकॉयने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर म्हटले की, “हे माझ्यासाठी आईसाठी आहे. ती आजारी आहे आणि तिने मला नेहमीच चांगला खेळाडू बनण्यासाठी प्रेरणा दिली आहे. मी पहिल्याच चेंडूवर विकेट घेतल्यामुळे भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण झाला. मी नेहमीच पावरप्लेमध्ये विकेट घेण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे.”

“मी नेहमी स्पष्ट मानसिकतेसह मैदानावर उतरलो आहे. मागील सामन्यात मी गरजेपेक्षा जास्त विचार करत होतो. मला माझ्या भूमिकेमुळे खूप आव्हान आणि अनुभव मिळतो. यामुळे एक खेळाडू म्हणून मला स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी मदत मिळते”, असेही त्याने पुढे म्हटले.

दरम्यान मॅकॉयचा हा कारकिर्दीतील १८ वा टी२० सामना होता. या सामन्यात १७ धावांवर ६ विकेट्स घेत त्याने टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीची नोंद केली आहे. त्याने आतापर्यंत १८ टी२० सामन्यात एकूण २९ विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

दुसरा टी-२० सामना गमावल्यामुळे सुटला रोहितचा संयम, वाचा कुणावर फोटले पराभवाचे खापर

मेकॉय पुढे टीम इंडियाची वाताहात! दुसरा टी२० जिंकत यजमानांनी मालिका आणली बरोबरीत

रोहितने अविश्वास दाखवलेल्या खेळाडूने ठोकले तब्बल ४० षटकार; स्ट्राईक रेट होता…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---