आयर्लंड संघ सध्या वेस्ट इंडिज (Ireland tour of West Indies) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना सबिना पार्कमध्ये (Sabina park) पार पडला. या रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिज संघाने २४ धावांनी विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने असा काही षटकार मारला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.(West Indies vs Ireland 1st odi)
या सामन्यात आयर्लंड (Ireland) संघाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावेळी ४७ व्या षटकात आपला पहिलाच सामना खेळत असलेला ओडीन स्मिथ (Odean Smith) ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. शेवटची षटकं असल्यामुळे ओडीन स्मिथने कसलाही विचार न करता चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली. अशातच ४८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गगनचुंबी षटकार मारला.
हा षटकार इतका लांब होता की, तो मैदानाबाहेर पार्क केलेल्या कार वर जाऊन पडला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चेंडू थेट निळ्या रंगाच्या रेंज रोव्हर गाडीवर जाऊन पडला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याने पुढील षटकात आणखी २ षटकार मारले. यासह त्याने ८ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी केली.(Odean Smith six video)
⚠️ Six hitting zone, park at your own risk! 🚗
📺 Watch #Smith’s mammoth hit on #FanCode 👉 https://t.co/NhBMDC1MiN#WIvIRE @windiescricket @cricketireland pic.twitter.com/5F4IZakjH7
— FanCode (@FanCode) January 9, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २६९ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये शर्मर ब्रुक्सने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली, तर कायरन पोलार्डने ६९ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाकडून अँड्र्यू बालबिर्नीने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तसेच हॅरी टेक्टरने ५३ धावांचे योगदान दिले. परंतु आयर्लंड संघाला दिलेले आव्हान पूर्ण करता आले नाही. हा सामना वेस्ट इंडिज संघाने २४ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या:
‘कॅप्टन’ कोहलीचा ‘विराट’ कारनामा! दक्षिण आफ्रिकेत ‘अशी’ कामगिरी करणारा तिसराच कर्णधार
विराटच्या शतकाचा दुष्काळ संपता संपेना! इतके दिवस, इतके डाव शंभरीविणा
हे नक्की पाहा: