आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आठ ऐवजी दहा संघ खेळताना दिसणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी पुढच्या आयपीएल हंगामात सहभागी होणार आहेत. या दोन नवीन संघांमुळे अधिक खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. या दोन नवीन संघांच्या पार्श्वभूमीवर मेगा लिलाव (IPL 2022 mega auction) देखील आयोजित केला जाणार आहे. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे आहेत, ज्यांना यावर्षी त्यांचे आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. आपण या लेखात देशांतर्गत क्रिकेटमधील अशाच पाच खेळाडूंचा विचार करणार आहोत, जे पुढच्या हंगामात आयपीएल पदार्पण करू शकतात.
आर साई किशोर –
आर साई किशोर त्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंपैकी एक आहे, जो आयपीएल २०२२ मध्ये पदार्पण करू शकतो. देशांlर्गत क्रिकेटमध्ये तो तामिळनाडू संघासाठी खेळतो. मागच्या काही वर्षांमध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तो एक डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, सोबतच फलंदाजीही बऱ्यापैकी करू शकतो.
तिलक वर्मा –
हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज तिलक वर्मा मागच्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. क्रिकेटमधील काही तज्ञांनी सांगितले आहे की, तो भविष्यातील एक प्रतिभावान खेळाडू असेल. आयपीएल संघांनाही वरच्या फळीत एका भारतीय फलंदाजाची आवश्यकता असू शकते. अशात तिलक वर्मावर पुढच्या हंगामासाठी फ्रेंचायझी बोली लावू शकतात. तिलक फलंदाजीसोबतच ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करू शकतो.
अक्षय कर्णेवार –
अक्षय कर्णेवार त्या खेळाडूंच्या यादीत मोडतो, जे दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतात. गोलंदाजीसोबतच तो संघाच्या खालच्या फळीत चांगल्या फलंदाजाची भूमिका देखील पार पाडू शकतो. अलिकडच्या काळात खेळल्या गेलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धांमध्येही तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
बाबा अपराजित –
बाबा अपराजित हा एक असा खेळाडू आहे, ज्याने खूप आधीच आयपीएलमध्ये पदार्पण करणे अपेक्षित होते, परंतु त्याला संधी मिळाली नाही. पण आता निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडली आहे आणि नुकतेच त्याने भारताच्या अ संघात स्वतःचे स्थान बनवले आहे. तामिळनाडूचा हा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतो. अशात आयपीएल २०२२ मध्ये जर त्याने पदार्पण केले, तर ही आश्चर्याची गोष्ट नसेल.
अर्जन नागवासवाला –
अर्जन नागवासवाला त्या खेळाडूंमध्ये सामील आहे, जे आयपीएलच्या पुढच्या हंगामात स्वत:चे पदार्पण करू शकतात. गुजरातचा डावखुरा वेगवान गोलंदाज, अर्जन मागच्या वर्षी भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. भारतीय संघ आणि आयपीएल फ्रेंचायजींना एका चांगल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे. अर्जनने देशांतर्गत क्रिकेटमधील मर्यादित षटकांच्या प्रकारात चांगले प्रदर्शन केले आहे आणि त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये तो पदार्पण करेल, अशी पूर्ण शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! भारताच्या वनडे संघात दोन बदल, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूची निवड
ऑफ टू SA..! वनडे मालिकेसाठी धवनसह ‘हे’ भारतीय शिलेदार दक्षिण आफ्रिकेला रवाना, बघा फोटो
विराटला नाबाद घोषित केल्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार आले आमने सामने, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहा –