दक्षिण आफ्रिका आणि भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर रोमांचक सामना सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. ज्यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा संपूर्ण डाव २२३ धावांवर संपुष्टात आला. ज्यामध्ये कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli) सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली होती. दरम्यान, विराट कोहली खेळपट्टीवर असताना असा काहीतरी प्रकार घडला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना दक्षिण आफ्रिका संघाकडून डेन ओलिवियर ५२ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी या षटकातील एका चेंडूवर विराट कोहलीने फ्लिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा प्रयत्न फसला चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. झेल टिपताच सर्व खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली. परंतु, पंचांनी फलंदाज नाबाद असल्याचे सांगितले. त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाने डीआरएसची मागणी केली होती.
डीआरएसची मागणी केल्यानंतर अल्ट्रा एजमध्ये काहीतरी हालचाल झाल्याचे दिसून आले होते. हे पाहून दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भलतेच खुश झाले होते. त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली होती. परंतु, पंचांनी स्पष्टपणे सांगितले की, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. चेंडू थायपॅडला लागून यष्टिरक्षकाकडे गेला होता. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी तो अवघ्या ३९ धावांवर फलंदाजी करत होता.
https://twitter.com/BenaamBaadshah4/status/1480892531474714626?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1480892531474714626%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Find-vs-sa-virat-kohli-dean-elgar-chat-after-india-captain-survives-drs-scare-101641906226497.html
तिसऱ्या पंचांनी विराट कोहलीला नाबाद घोषित केेल्यानंतर विराट कोहली आणि डीन एल्गर (Dean Elgar) यांच्यात चर्चा देखील झाल्याचे दिसले होती. या डावात विराट कोहलीने ७९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
महत्वाच्या बातम्या :
भारीच ना!! टप्पा पडताच बुमराहच्या चेंडूने बदलला काटा; काही कळायच्या आत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बाद
भारतीय संघाकडून कोच राहुल द्रविडचा ४९ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो होतायेत व्हायरल
हे नक्की पाहा: