---Advertisement---

CWC23: पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, इंग्लडला फलंदाजीचे आमंत्रण, दोन दिग्गज बाहेर

On: गुरूवार, ऑक्टोबर 5, 2023 1:48 PM
ENG-vs-NZ
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागील विश्वचषकाचा विजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना सुरू झाला. न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन व इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत.

सलग दीड महिने होणाऱ्या या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात मागील विश्वचषकाचे विजेते व उपविजेते समोरासमोर आले. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्याच्या जागी टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसला. तर इंग्लंडला बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे खेळवता आले नाही. त्यामुळे इंग्लंड साठी युवा हॅरी ब्रुक याने पदार्पण केले.

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन-

जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, हॅरी ब्रूक.

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन-

डेवॉन कॉनवे, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टॉम लॅथम( कर्णधार), ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, मॅट हेन्री

(ODI Cricket World Cup Newzealand Won Toss And Elected Bowl Williamson Stokes Misses)

हेही वाचा-
भारताच्या रणरागिणींची कमाल! तिरंदाजीत मिळवलं Gold, देशाच्या नावावर Asian Gamesमध्ये 82वे पदक
विश्वचषकापूर्वी रोहितचे विधान चर्चेत; म्हणाला, ‘मला आणि खेळाडूंना माहितीये…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---