---Advertisement---

शानदार शतकासह गांगुली, लाराचा विक्रम उध्वस्त; स्टिव्ह स्मिथची बड्या विक्रमात आगेकूच

Steve-Smith
---Advertisement---

न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालकेतील पहिले दोन्हीही सामने जिंकत यजमान ऑस्ट्रेलियाने 2-0 ने वनडे मालिका खिशात घातली आहे. यानंतर आता रविवारी (11 सप्टेंबर) उभय संघात तिसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ याने चमकदार खेळ दाखवत शतक झळकावले. या शतकासह त्याने बरेच विक्रम केले आहेत. 

स्मिथने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतकी खेळी केली. 131 चेंडू खेळताना 1 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने त्याने 105 धावा फटकावल्या. अखेर मिचेल सँटनरने त्याला त्रिफळाचीत केले. अशाप्रकारे जवळपास 2 वर्षांनी स्मिथच्या बॅटमधून वनडे क्रिकेटमध्ये शतक निघाले. यापूर्वी त्याने 29 नोव्हेंबर 2020 ला भारताविरुद्ध सिडनी वनडेत शतक ठोकले होते. या सामन्यात त्याने 105 धावा केल्या होत्या.

याबरोबरच हे स्मिथचे वनडेतील 12 वे शतकही आहे. 121 डावात फलंदाजी करताना त्याने ही शतके केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे 40 वे शतक आहे. या शतकासह त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12 शतके करण्याच्या विक्रमाच्या यादीत आपल्या नावाची भर घातली आहे. त्याने या यादीत ब्रायन लारा आणि सौरव गांगुली यांना मागे सोडले आहे. लाराने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12 शतके करण्यासाठी 124 डाव घेतले होते. तर गांगुलीने 130 डाव खेळले होते.

वनडेत सर्वात जलद 12 शतके करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याच्या नावावर आहे. डी कॉकने 74 डावांमध्ये 12 शतके केली होती. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने त्याचे 12वे वनडे शतक 75 डावात केले होते.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 12 शतके (डावांनुसार)-
क्विंटन डी कॉक (74 डाव)
बाबर आझम (75 डाव)
हाशिम अमल (81 डाव)
विराट कोहली (83 डाव)
डेव्हिड वॉर्नर (90 डाव)
मार्कस ट्रेस्कोथिक (119 डाव)
उपुल थरंगा (119 डाव)
सईद अन्वर (120 डाव)
हर्शल गिब्स (120 डाव)
एबी डिव्हिलियर्स (120 डाव)
स्टीव्ह स्मिथ (121 डाव)
ब्रायन लारा (124 डाव)
सौरव गांगुली (130 डाव)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या फिंचवर साउदीने नाही दाखवली दया, पाहा कसा उडवला त्रिफळा
‘टी20 विश्वचषकात दीपक चाहर अन् अर्शदीपला संधी मिळणार!’ भारतीय दिग्गजाने केलाय दावा
‘पंत की कार्तिक’ टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळावे?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---