पाकिस्तान संघ पुन्हा एकदा विश्वचषक 2023 स्पर्धेत भारताविरुद्ध आपली लाज वाचवण्यात अपयशी ठरला. भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभवाची धूळ चारत विश्वचषक इतिहासात तब्बल 8व्यांदा नमवण्याचा विक्रम केला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजीतून कमाल करत 86 धावांची विस्फोटक खेळी साकारली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. मात्र, सामना संपल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम विराट कोहली याचा चाहता बनला. सामन्यात पराभूत झाल्यानंतर बाबरने विराटकडून जर्सीवर ऑटोग्राफ घेतला.
फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
बाबर आझम याच्या या फॅन मोमेंटचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओत दिसते की, बाबर आझम आणि विराट कोहली (Babar Azam And Virat Kohli) एकमेकांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान विराटने बाबरला ऑटोग्राफ असणारी भारतीय जर्सी दिली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
FANBOY MOMENT FOR BABAR AZAM….!!
Babar asks for a signed from Virat Kohli and Virat gives it.https://t.co/Caq3GoQoaV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “बाबर इतका लकी का आहे? तो किंग कोहलीला पाहत आहे, जर्सी घेत आहे, एवढंच नाही, तर एकसोबत खेळतही आहे.” दुसऱ्या एकाने बाबर आझम (Babar Azam) याचे कौतुक करत लिहिले की, “बाबर खूपच विनम्र आहे. तो वरिष्ठ क्रिकेटपटूंचा आदर करतो.” अशाप्रकारे चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतीय संघाविरुद्ध बाबरची वनडेत सर्वाधिक धावसंख्या
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील 12व्या सामन्यात बाबर आझम याने भारताविरुद्ध सर्वोच्च वनडे धावसंख्या उभारली. त्याने 50 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानकडून ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 42.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 191 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्मा (86) आणि श्रेयस अय्यर (नाबाद 53) यांच्या जोरावर 30.3 षटकात 3 विकेट्स गमावत 192 धावा केल्या. तसेच, सामना 7 विकेट्सने काबीज केला. (odi world cup 2023 ind vs pak babar azam become fan of legend virat kohli and took autographed jersey)
हेही वाचा-
पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच भारताने हलवलं न्यूझीलंडचं सिंहासन, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टाका नजर
हिटमॅन थांबत नसतोय! 86 धावांच्या स्फोटक खेळीत बनवले तब्बल 11 रेकॉर्ड्स