भुवनेश्वर, १ डिसेंबर : सात सामन्यांत ५ विजयाची नोंद करणाऱ्या ओडिशा एफसीला हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) गतविजेत्या हैदराबाद एफसीला तालिकेत मागे टाकण्याची संधी आहे. शुक्रवारी त्यांच्यासमोर यंदाच्या पर्वात पहिल्या गुणाच्या शोधात असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचे आव्हान आहे. (League Standings)
ओडिशाने मागील दोन सामन्यात धडाकेबाज पुनरागमन करताना विजय मिळवले. चेन्नईयन एफसीविरुद्ध ९५ व्या मिनिटाला गोल करून ओडिशाने विजय खेचून आणला होता. त्याआधीच्या सामन्यात ईस्ट बंगाल एफसीविरुद्ध ०-२ अशा पिछाडीवरून ४-२ असा दमदार विजय मिळवला होता. आता जोसेफ गोम्बाऊचा संघ सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत.
हिरो आयएसएलच्या या पर्वात घरच्या मैदानावर तीनही सामने जिंकणारा ओडिशा एकमेव संघ आहे. ओडिशा एफसीला मागील सामन्यात सुरुवातीला उतरवले नाही, परंतु बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरत त्याने पाच सामन्यांतील गोलदुष्काळ संपवला. ही संघासाठी चांगली बाब आहे. (Club Statistics)
“प्रत्येक सामन्यांत जसा आमचा खेळ करण्याचा प्रयत्न असतो तोच याही सामन्यात कायम ठेवणार आहे. नॉर्थ ईस्टचा आम्ही प्रचंड आदर करतो. मागील दोन सामन्यांत त्यांनी तगड्या स्पर्धकांचा सामना केला आहे आणि एटीके मोहन बागान विरुद्ध त्यांचा खेळ उल्लेखनीय झाला होता,” असे गोम्बाऊ म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “हे आम्ही लक्षात ठेवायला हवं. या लीगमधील प्रत्येक सामना हा आव्हानात्मक आहे. आदर करण्याचा भाग सोडला तर आम्ही या सामन्यात अन्य स्पर्धकांप्रमाणेच नॉर्थ ईस्टला टक्कर देऊ.”
नॉर्थ ईस्ट युनायटेडला अद्याप सूर गावसलेला नाही आणि सात सामन्यांत त्यांनी हार पत्करली आहे. या सात सामन्यांत त्यांनी केवळ ३ गोल केले आहेत. ही आतापर्यंतची नीचांकी कामगिरी आहे. त्यांच्याविरोधात सर्वाधिक १६ गोल झाले आहेत. (Club Statistics)
” स्टाफ खूप चांगला आहे आणि त्यांनी मला खूप मदत केली आहे. सराव सत्रात खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला होता आणि ते अथक परिश्रम घेत आहेत. मैदानावरील त्यांच्या कामगिरीवर माझी तक्रार नाही, कारण ते अखेर पर्यंत कडवी टक्कर देत आहेत. अस3 निकाल लागल्यानंतरही सतत स्वतःला प्रेरणा देत राहणे सोपे नाही. मैदानावर आम्ही बदल घडवू असा मला विश्वास आहे. आम्ही प्रत्येक सामन्यात कडवी टक्कर देऊ,” असे मुख्य प्रशिक्षक मार्को बॅलबुल म्हणाले.
Durand Cup स्पर्धेत उभय संघ अखेरचे भिडले होते आणि ओडिशाने ६-० अशा फरकाने नॉर्थ ईस्टवर विजय मिळवला होता. हिरो आयएसएलमध्ये दोन्ही संघात ६ सामने झाले आणि त्यात ओडिशाने ३ जिंकले. नॉर्थ ईस्टने २ सामने जिंकले, तर एक अनिर्णित राहिला. (Odisha FC looking for consistency, North East United still in search of first points)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलने लग्नासाठी बीसीसीआयकडे मागितली सुट्टी! आथियासोबत ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ
कॅम्पमध्ये ‘बिन बुलाए मेहमान’ आल्यानंतर जो रुटने केला पाहुणचार, व्हिडिओ होतोय व्हायरल