Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओडिशा एफसीला विजयपथावर परतायचे आहे, पण समोर ईस्ट बंगाल एफसीचे तगडे आव्हान

ओडिशा एफसीला विजयपथावर परतायचे आहे, पण समोर ईस्ट बंगाल एफसीचे तगडे आव्हान

November 17, 2022
in टॉप बातम्या
fOOTBALL

fOOTBALL


कोलकाता, १७ नोव्हेंबर : ईस्ट बंगाल एफसी हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या या पर्वात घरच्या मैदानावर पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मागील सामन्यात त्यांनी यजमान बंगळुरू एफसीवर विजय मिळवून आत्मविश्वास कमावला आहे आणि शुक्रवारी त्यांच्यासमोर ओडिशा एफसीचे आव्हान असणार आहे. कोलकाताच्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर ही लढत होणार आहे. ओडिशा एफसी सध्या तालिकेत ईस्ट बंगालपासून ३ गुणांनी आघाडीवर आहेत. शिवाय त्यांनी एक सामना कमी खेळलेला आहे.

चारिस किरियाकूने ईस्ट बंगालच्या मध्यरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बचवापटूचा मध्यरक्षक झालेल्या किरियाकूने आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी पास दिले आहेत आणि प्रती सामना त्याच्या यशस्वी पासची सरासरी ही २४ इतकी आहे. त्याने सर्वाधिक ३ शॉट ऑन टार्गेट प्रयत्न केले आहेत. मागील आठवड्यात बंगळुरू एफसीवर १-० असा विजय मिळवल्यानंतर घरच्या मैदानावर परतलेल्या ईस्ट बंगालचा आत्मविश्वास वाढला आहे. त्या सामन्यात त्यांच्या बचावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आणि संघाला तीन गुण मिळवन देण्यात सिंहाचा वाटा उचलला. यंदाच्या पर्वात त्यांनी सर्वाधिक २७ शॉट्स ऑन टार्गेट मारले आहेत.

ओडिशा विरुद्धच्या आकडेवारीबाबत विचारले असता मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन म्हणाले की, ”मागच्या वर्षी किंवा त्याआधी काय झालं याची मला पर्वा नाही. ओडिशा एफसीचा संघ चांगला आहे आणि त्यांच्याकडे जोसेप गोम्बाऊसारखा अनुभवी प्रशिक्षक आहे. त्याच्याकडे सामना कसा खेळला जावा याची कल्पना आहे. त्यांचा खेळ आम्ही पाहिला आहे आणि त्यांच्या मुकाबला करण्यासाठी तयार आहोत. या सामन्यात किती गोल होतील, याचं भाकित मी करू शकत नाही, परंतु ही क्लीन शीट राहिल आणि आम्ही बाजी मारू, अशी मला आशा आहे.”

दोन आठवड्यांच्या विश्रांतीसह ओडिशा एफसी मैदानावर उतरणार आहे. मागील सामन्यात हैदराबाद एफसीकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. एका गोलने त्या सामन्याचा निकाल हैदराबादच्या बाजूने लावला होता. पण, या सामन्यात ओडिशा एफसीच्या खेळाडूंनी चेंडूवर सर्वाधिक ताबा राखला होता आणि अधिक पासही दिले होते.  ओडिशाने हिरो आयएसएलमध्ये ईस्ट बंगालविरुद्ध १५ गोल्स केले आहेत आणि आतापर्यंत ईस्ट बंगालविरुद्ध सर्वाधिक गोल करण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.

ईस्ट बंगालविरुद्धचा गोल पाऊस लक्षात घेता प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊंना त्यांच्या आक्रमणपटूंकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे. डिएगो मौरिसिओ हा या पर्वात ओडिशाच्या सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतोय, परंतु मागील चार सामन्यांत त्याला गोल करता आलेला नाही. त्यात मागील दोन सामन्यांत त्याला शॉट ऑन टार्गेटही मारता आलेला नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला दुसऱ्या हाफमध्ये बाहेर बोलावण्यात आले आणि त्याच्या जागी पेड्रो मार्टीनला मैदानावर उतरवले होते.

”हैदराबादविरुद्धच्या लढतीनंतर आम्हाला खूप मोठा ब्रेक मिळाला. त्यामुळे आम्हाला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला आणि काही दिवसानंतर आम्ही पुन्हा सरावाला सुरूवात केली. उद्याच्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत. संघाचा सराव चांगला झालेला आहे आणि या स्टेडियमवर खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आशा करतो की चांगला निकाल पाहायला मिळेल,”असे बोम्बाऊ म्हणाले.

ओडिशा एफसी आणि ईस्ट बंगाल एफसी यांना यंदाच्या पर्वात केवळ एकच क्लीन शीट ( एकही गोल झाला नव्हता) राखता आली आहे. हिरो आयएसएलमध्ये दोन्ही संघ चारवेळा समोरासमोर आले आणि ओडिशाने ३, तर ईस्ट बंगालने १ विजय मिळवला आहे. या चार सामन्यांत दोन्ही संघांनी मिळून २८ गोल केले आहेत.

 


Next Post
india-test-team

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी बीसीसीआयने आखली नवी योजना; 'त्या'दोघांना मिळू शकते जबाबदारी

Football

प्रीमियर लीगसह FSDLची भागीदारी भारतीय फुटबॉलमध्ये भरीव सुधारणा करू शकते - प्रीमियर लीगचा दिग्गज खेळाडू पॉल डिकोव्ह

Rajasthan Royals

राजस्थान रॉयल्सची झाली आहे चांदी, रीटेन केलेला 'हा' खेळाडू आहे भलत्याच फॉर्ममध्ये

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143