पाकिस्तानचा प्रतिभावान फलंदाज अहमद शहजादने स्पष्ट केले आहे की विराटशी तुलना केल्यामुळे त्याच्यावर दबाव येतो. विराटपेक्षा कसोटी कारकिर्दीची सुरुवात चांगली करणाऱ्या व क्रिकेटच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शाहजादची सतत विराटशी तुलना होत होती. परंतु २०१७ पासून या खेळाडूला पाकिस्तान संघातून संधी मिळाली नाही.
२०१९मध्ये तो पाकिस्तानकडून केवळ टी२० क्रिकेट खेळला आहे.
“होय माझ्यावर तुलनेमुळे दबाव येतो. आपण खेळाडूंना त्याच्या पाठीमागील पार्श्वभूमी किंवा परिस्थीतीचा विचार न करता तुलना करतो. एखाद्या खेळाडूला यश मिळवायचं असेल तर त्याला प्रशिक्षक, कर्णधार व बोर्डाचा पाठींबा लागतो. तसेच त्या खेळाडूनेही चांगली कामगिरी करावी लागते,” असे क्रिकइनगिफशी बोलताना शाहजाद म्हणाला.
“खेळाडूंना योग्य पाठींबा दिल्याशिवाय त्यांना आत्मविश्वास मिळणार नाही. तुम्ही जर विराट, रुट, विलीयमसन किंवा बाबर आझमकडे पाहिलं तर ते भाग्यवान आहेत. कोहलीला अनेक मालिकांमधून बाहेर बसवणार होते परंतु त्याला धोनीने पाठींबा दिला. रोहितलाही तसाच पाठींबा धोनीने दिला,” असेही तो पुढे म्हणाला.
शाहजादने पाकिस्तानकडून १३ कसोटी, ८१ वनडे व ५९ टी२० सामने खेळले आहेत.