एबीसी स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीने ‘बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या’ सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या, एबीसी बास्केटबॉल लीग च्या तिसऱ्या हंगामाची आज अधिकृत घोषणा झाली. त्याच बरोबर या दिवशी भारतात प्रथमच बास्केटबॉल खेळणाऱ्या १४ व १६ वर्षाखालील खेळाडूंचा या लीग स्पर्धासाठी लिलाव पार पडला.
या हंगामाची सुरुवात १३ जुलै २०२४ रोजी खेळाडूंच्या लिलावाने झाली ज्यामध्ये सर्व संघानी महाराष्ट्रातले तसेच देशभरातील खेळाडूं वर बोली लावली. या युवा खेळाडूंना त्यांचे बास्केटबॉल मधील कौशल्य दाखवण्याची आणि भारतीय बास्केटबॉलचे भविष्यातील स्टार बनण्याची संधी देणे हा या लीगचा उद्देश आहे. बास्केटबॉल खेळणाऱ्या १४ व १६ वर्षाखालील मुलांसाठी ही भारतातील एकमेव व्यावसायिक लीग स्पर्धा आहे.
पुण्यातील खराडी स्टेडियममध्ये १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत लीगचे सामने होणार असून, लीगमध्ये ६० सामने होणार आहेत. २३ ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम फेरीसह या लीग चा समारोप होईल. या वर्षीच्या लीगमध्ये १४ आणि १६ वर्षांखालील गटांमधील खेळाडूचे आयपीएलच्या समान स्वरूपानुसार १८ संघ असतील. विजयी बक्षीस रक्कम प्रत्येक श्रेणीसाठी एक लाख असेल.
पत्रकार परिषदेत बोलताना, ABC स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीचे संस्थापक श्री. अनिरुद्ध पोले म्हणाले, “एबीसी बास्केटबॉल लीग बास्केटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना यशस्वी होण्याची संधी देण्यासाठी वचनबद्ध आहे. मुलांना लहानपणापासूनच खेळाविषयीच्या आवडी कडे लक्ष देणे आणि त्यांना त्यांच्या पात्रतेच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. खेळांला मुलांच्या जीवनाचा भाग बनवणे आणि त्यांचा खेळाचा वेळ संघटित क्रीडा वेळेत बदलणे हे आमचे ध्येय आहे.”
या लीग मध्ये पुणे, मुंबई, नाशिक, आणि कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून २४० मुलं व मुली खेळाडू सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर नितीन कामथ आणि रणविजय सिंग यांसारख्या उल्लेखनीय व्यक्तींच्या नियोजित उपस्थितीमुळे लीगचा उत्साह वाढणार आहे.
उच्चस्तरीय स्पर्धेची हमी देऊन हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहेत. स्टेडियममध्ये १००० पेक्षा जास्त प्रेक्षक ही स्पर्धा थेट पाहू शकतील. प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे आणि हे सामने स्पोर्टवोट ॲपवर थेट प्रक्षेपित देखील केले जाणार आहेत. एबीसी बास्केटबॉल लीग सीझन 3 हा बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि सुरेंद्र पठारे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रेनमॅटर तर्फे झेरोधाचा एक उपक्रम आहे. अमनोरा पार्क टाऊन आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचे सहकार्या देखील या लीगला मिळाले आहे.
सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू
अंडर 14
वैष्णवी परदेशी (चितळे वॉरिअर्स) – 12.75 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
सिया भोसले (त्रिनिता हिट्स) – 12.75 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
आर्यन प्रजापती (सुपरनोव्हा स्टार्स) – 10.5 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
अंडर 16
रेवा कुलकर्णी (द स्ट्रोम गर्ल्स) – 11 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
आदित्य पवार (बिस्ट बॉलर्स) – 7.25 लाख व्हर्चुअल पॉइंट्स
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेचे 3 खेळाडू, जे टी20 मालिकेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतात
टीम इंडियाचे 5 ‘अमीरजादे’, फक्त लक्झरी कार आणि बाईकच नाही तर प्रायव्हेट जेटचे देखील आहेत मालक
“त्यानं लवकर माफी मागावी” ब्रायन लारावर भडकला विव्ह रिचर्ड्स