चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या भारत-इंग्लंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (१५ फेब्रुवारी) इंग्लंडच्या खेळाडूंनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. त्यातही इंग्लंडचा मधल्या फळीतील फलंदाज ऑली पोपने क्षेत्ररक्षणात अविश्वसनीय कामगिरी केली. सर्वप्रथम त्याने कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला चातुर्याने धावबाद केले. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा अप्रतिम झेल त्याने घेतला.
भारताच्या दुसऱ्या डावातील ३१ वे षटक चालू असताना अष्टपैलू मोईन अलीने फिरकी चेंडू टाकला. यावर पुढे येत गुडघ्यावर बसून रहाणेने हवेत शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू रहाणेच्या पायावरील पॅडला लागून शॉर्ट लेगच्या दिशेने उडाला. तो चेंडू क्रिजच्या जास्त बाहेर गेला नाही आणि इतक्या नजीकच्या अंतरावर इंग्लंडचा एकही खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभारलेला नव्हता. अशात कुणीही झेल पकडणे, अशक्य वाटत होते.
तेवढ्यात ऑली पोपने हवेत सूर मारत मोठी झेप घेतली आणि चेंडू पकडला. हे पाहून रहाणेसह नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेला विराट कोहलीही अचंबित झाला. पोपच्या या भन्नाट झेलमुळे रहाणेला ३०.३ षटकात अवघ्या १० धावांवर पव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.
https://twitter.com/ShubhmanC/status/1361181239793844225?s=20
रहाणेपुर्वी पोपने पुजाराला अविश्वसनीय पद्धतीने बाद केले होते. पुजाराच्या बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि टप्पा घेऊन सरळ पोपच्या हातात गेला. त्यानंतर त्वरित पोपने चेंडू यष्टीमागे उभा असलेल्या बेन फोक्सच्या दिशेने फेकला आणि त्याने यष्टी उडवत पुजाराला झेलबाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा धोनी!! पुजारा आणि रोहितनंतर बेन फोक्सच्या चपळाईपुढे रिषभ पंतही गपगार
Video: बड्डे बाॅय जोमात, रोहित कोमात! बेन फोक्सचे जबरदस्त यष्टीरक्षण अन् हिटमॅनची दांडी गुल
काय अरे पुजारा.. बॅट तरी निट पकड!! पाहा कसा विचित्र पद्धतीने बाद झालाय चेतेश्वर पुजारा