ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी देखील इंग्लंड संघाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. परंतु, जॉनी बेअरस्टो आणि ऑली पोपने तुफान फटकेबाजी करत पुन्हा एकदा इंग्लंड संघाला पुनरागमन करून दिले होते.
दरम्यान पोपने शार्दुल ठाकूरच्या एकाच षटकात चार चौकार मारले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी (२ सप्टेंबर ) शार्दुल ठाकूरने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने अर्धशतकी खेळी करत ५७ धावांची खेळी केली होती. परंतु, गोलंदाजी करताना तो काहीसा महागडा ठरला आहे. दरम्यान त्याच्या गोलंदाजीवर ऑली पोपने एकाच षटकात सलग ४ चौकार मारले आहेत.
इंग्लंडचे मुख्य फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर इंग्लंड संघ बॅकफूटवर आला होता. परंतु, ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांनी मिळून महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली आणि इंग्लंड संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
तर झाले असे की, ३१ वे षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिले दोन चेंडू त्याने निर्धाव टाकले. परंतु, तिसऱ्या चेंडूवर पोपने सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्ह शॉट खेळत चौकार लगावला होता. त्यानंतर चौथा चेंडू पॅडला स्पर्श होऊन थर्ड मॅनच्या दिशेने चार धावांसाठी गेला होता. त्यानंतर तिसरा चौकार पोपने मिड ऑनच्या दिशेने लगावला होता. तसेच शेवटच्या चेंडूवर पोपने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकातील सलग चौथा चौकार लगावला होता.(Ollie pope hits back to back 4 boundries in shardul thakur’s over)
Ollie Pope is enjoying his time in the middle 🏏#WTC23 | #ENGvIND | https://t.co/zRhnFj1Srxpic.twitter.com/bHWA0VNuDi
— ICC (@ICC) September 3, 2021
भारतीय गोलंदाजांचा पलटवार, पण इंग्लंडच्या शेपटाचाही तडाखा
भारतीय संघाचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेले इंग्लंडचे सलामीवीर लवकर माघारी परतले होते. जसप्रीत बुमराहने रॉरी बर्न्स आणि हमीदला बाद करत माघारी धाडले होते. त्यानंतर उमेश यादवने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला त्रिफळाचित करत माघारी धाडले होते.
तसेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील उमेश यादवचा जलवा सुरूच राहिला. त्याने सुरुवातीला ओव्हरटनला बाद केले. त्यानंतर डेव्हिड मलानला ही बाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
मात्र, त्यानंतर ऑली पोपने इंग्लंडच्या फलंदाजीची जबाबदारी हाती घेतली. त्याने जॉनी बेअरस्टोसह (३७) ८९ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर त्याने मोईन अलीसह (३५) ७१ धावांची भागीदारी करत इंग्लंडला आघाडीवर नेले. अखेर पोपला ८१ धावांवर शार्दुल ठाकूरनेच त्रिफळाचीत केले. मात्र, अखेरच्या विकेटसाठी ख्रिस वोक्स आणि जेम्स अँडरसनने ३५ धावांची भागीदारी करत इंग्लंडची आघाडी आणखी वाढवली. वोक्सनेही ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे अखेर इंग्लंडने २९० धावा करत ९९ धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर दुसऱ्या दिवसाखेर भारताने बिनबाद ४३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी कर्णधाराकडून वाकयुद्धास सुरुवात; म्हणाला…
उमेशने टाकलेल्या चेंडूने घेतली मलानच्या बॅटची कड अन् रोहितने टिपला अविश्वसनीय झेल, पाहा व्हिडिओ
युएईमध्ये सर्वाधिक आयपीएल सामने जिंकणारे ५ कर्णधार; रोहित ५ व्या क्रमांकावर