---Advertisement---

ऑली रॉबिन्सनचा कहर! भारताच्या ५ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ

On: रविवार, ऑगस्ट 29, 2021 2:11 AM
---Advertisement---

हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंड संघाने ३५४ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघाला दुसऱ्या डावात अवघ्या २८७ धावा करता आल्या होत्या. या डावात इंग्लंड संघाकडून ऑली रॉबिन्सनने पाच भारतीय फलंदाजांना माघारी धाडले होते. चला तर जाणून घेऊया कोण होते ते फलंदाज.

रोहित शर्मा :
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल अवघ्या ८ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर रोहित शर्माने चेतेश्वर पुजारा सोबत महत्वाची भागीदारी केली होती. या डावात रोहितने ५९ धावांची खेळी केली होती. त्याला ऑली रॉबिन्सनने पायचीत करत माघारी धाडले होते.

तर झाले असे की, ४८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनने अप्रतिम चेंडू टाकला होता, तो चेंडू रोहित शर्माच्या पॅडला जाऊन धडकला होता. ऑली रॉबिन्सनने जोरदार मागणी केली असता, पंचांनी बाद घोषित केले होते. त्यानंतर रोहितने त्वरित डीआरएसची मागणी केली होती. यादरम्यान त्याला अंपायर्स कॉलमुळे बाद होऊन परतावे लागले होते.

चेतेश्वर पुजारा :
चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या दिवशी टीचून फलंदाजी करत ९१ धावांची खेळी केली. त्यामुळे चौथ्या दिवशी असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, चौथ्या दिवस तो शतक झळकावून मोठी खेळी खेळणार. परंतु, सुरुवातीलाच ऑली रॉबिन्सनने त्याला पायचीत करत माघारी धाडले होते.

तर झाले असे की, ८४ वे षटक टाकण्यासाठी ऑली रॉबिन्सन गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसराच चेंडू रॉबिन्सनने पॅडच्या दिशेने टाकला. पुजाराने तो चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो चेंडू आत आला आणि पुजाराच्या पॅडला लागला. त्यावेळी इंग्लिश खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली. परंतु, पंचांनी मान हलवून नकार दिला. त्यावेळी जो रुटने डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये स्पष्ट दिसून येत होते की, चेंडू यष्टीला जाऊन लागतोय. त्यामुळे पंचांनी आपला निर्णय बदलत पुजाराला बाद घोषित केले.

विराट कोहली :
भारतीय कर्णधार विराट कोहली देखील या डावात चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसून येत होता. परंतु, ऑली रॉबिन्सनने त्याला बाद करून माघारी धाडले होते. ९० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनने अप्रतिम चेंडू टाकला, जो विराटच्या बॅटचा कडा घेत जो रुटच्या हातात गेला होता.

रिषभ पंत:
ऑली रॉबिन्सनने रिषभ पंतला १ धावेवर बाद करत दुसऱ्या डावातील चौथ्या बळी घेतला. ९२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऑली रॉबिन्सनने अप्रतिम चेंडू टाकला टप्पा पडून बाहेरच्या दिशेने निघाला. या चेंडूवर रिषभ पंतने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, चेंडू बॅटचा कड घेत स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या क्रेग ओव्हरटनच्या हातात गेला आणि तो बाद होऊन माघारी परतला. (Ollie Robinson’s five wickets haul against India in 3rd test)

ईशांत शर्मा :
ईशांत शर्माला अवघ्या २ धावांवर बाद करत रॉबिन्सनने दुसऱ्या डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला. त्याने ९६ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जोस बटलरच्या हातून ईशांतला झेलबाद करत माघारी धाडले.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---