भारतीय कुस्ती क्षेत्र मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. तसेच सिंग हे खेळाडूंसोबत पक्षपातीपणा करत असल्याचे, म्हणत अनेक कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले होते. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक तसेच राष्ट्रकुल विजेती विनेश फोगट हे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. मोठ्या वादानंतर सिंग यांच्यावरील आरोप मागे घेतल्यावर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. असे असतानाच आता ऑलिम्पिक पदक विजेते योगेश्वर दत्त व बजरंग पुनिया हे आमने सामने आले आहेत.
सप्टेंबर महिन्यात चीनमधील हॅंगझू येथे एशियन गेम्स स्पर्धा खेळली जाणार आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपल्याला एशियन गेम्स चाचणी स्पर्धेत सवलत द्यावी, अशी मागणी केल्याचा आरोप योगेश्वर दत्त याने केला होता. त्या विरोधात बोलताना बजरंगने कोणत्याही खेळाडूंनी अशी मागणी केली नसून, यामध्ये सत्यता आढळल्यास आपण कुस्ती खेळणे सोडू असे म्हटले आहे.
आंदोलन करणाऱ्या खेळाडूंवर असा आरोप करण्यात आला होता की, या खेळाडूंनी चाचणी फेरीत फक्त एक सामना खेळण्यास मिळावा अशी मागणी केली आहे.
बजरंग व योगेश्वर हे गुरु शिष्य म्हणून ओळखले जातात. बजरंग याने आपल्या कुस्तीचे धडे योगेश्वर याच्याकडूनच छत्रसाल आखाड्यात घेतलेले. योगेश्वरने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पुन्हा योगेश्वरला संधी मिळावी यासाठी बजरंगने चाचणीतून माघार घेतली होती. त्यानंतर बजरंग याला तयार करण्यात योगेश्वरने महत्त्वाची भूमिका बजावली. बजरंगने देखील 2021 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.
(Olympic Medalist Yogeshwar Dutt And Bajrang Puniya Verbal Exchange About Asian Games Trials)
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा एकाच वेळी खेळणार दोन टीम इंडिया! एक भारतात तर दुसरी चीनमध्ये
“हार्दिकला लगेच वनडे संघाचा कर्णधार करा”, शास्त्रींनी केली बीसीसीआयकडे मागणी





