महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व नाशिक जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय श्री रेणुका फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ शिंदे गाव यांच्या विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरुष गट आमंत्रित कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
वंदनीय हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिंदे गाव, मराठी शाळेच्या मैदानात राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. १० जिल्ह्यातील यास्पर्धेत आमंत्रीत १९ पुरुष संघ सहभागी घेतला असून त्याचा ६ गटात विभाजन केलं आहे.
‘अ’गटात झालेल्या उत्कर्ष क्रीडा मंडळ, उपनगर विरुद्ध युवा स्पोर्ट्स नाशिक यांच्यात झालेल्या लढतीत उत्कर्ष उपनगर संघाने ३६-२० असा विजय मिळवत विजयी सलामी दिली. तर संघर्ष उपनगर संघाने ४०-३३ असा आझाद, अहमदनगर संघाचा पराभव केला.
ब्रम्हां आडगाव विरुद्ध ओम कल्याण यांच्यात झालेल्या सामन्यांत ओम कल्याण संघाने ४२-२६ असा सहज विजय मिळवला. सिंहगड क्रीडा मंडळ पुणे संघाने क्रीडा प्रबोधनी नशिकवर ४५-१७ असा विजय मिळवला.