येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर १९ ऑक्टोबर पासून टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. २०२१ टी -२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन बीसीसीआय करणार आहे. परंतु भारतात कोरोनाची परिस्थिती पाहता हे सामने युएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहेत. परंतु अद्याप विश्वचषकाचे अंतिम वेळापत्रक तयार झालेले नाही.
दरम्यान असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, टी२० विश्वचषकातील सुरुवातीचे सहा सामने हे युएईमध्ये नव्हे ओमानमध्ये खेळवण्यात येऊ शकतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे टी -२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल स्पर्धेचे सामने युएईच्या अबू धाबी, दुबई आणि शारजहामध्ये खेळवले जाणार आहेत.(Oman will host super 12 matches of T20 worldcup)
टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद सध्या बीसीसीआयकडे आहे. त्यामुळे या स्पर्धेतील सामने कुठे खेळवायचे यावर पूर्णपणे बीसीसीआयचा अधिकार आहे. क्रीकबजच्या वृत्तानुसार, दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत बीसीसीआयने ओमानमध्ये सुरुवातीचे सामने खेळवण्यावर चर्चा केली आहे. या स्पर्धेचे लॉन्चिंग जुलै महिन्यात मस्कटमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी म्हटले होते की, “बोर्ड छोट्या देशातील क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते आणि करत राहणार आहे. मला इथे ओमानमध्ये येऊन बरे वाटत आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले होते की, “मला ओमानमध्ये येऊन भरपूर आनंद झाला आहे. विश्व क्रिकेटमध्ये बलाढ्य असल्याने बीसीसीआयने नेहमीच शेजारी राष्ट्रांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आशिया क्रिकेट संघाचा अध्यक्ष असल्यामुळे मी नेहमीच असा विचार करतो की, आशियातील क्रिकेट खूप पुढे जावे. विश्वचषक स्पर्धेचे सह यजमानपद नक्कीच ओमानला जागतिक स्तरावर आणेल. ते आता पात्रता फेरीतील सामने खेळत आहेत. जर त्यांनी सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवला तर ही आणखी एक मोठी गोष्ट असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने धोनीसोबत जोडले नाते; फोटो शेअर करत म्हणाली, ‘होय, मी माहीची बहीण आहे’
‘ये चाँद सा रोशन चेहरा’ गाण्यावर विराटचा अनुष्कासंगे रोमँटिक डान्स; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह!’
कर्णधार विराटकडे क्रिकेटविश्वातील अव्वल ‘शतकवीर’ बनण्याची संधी; ‘हे’ विक्रमही असतील निशाण्यावर