बुधवारी(27 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा टी20 सामना तर विंडीज विरुद्ध इंग्लंड संघाच चौथा वनडे सामना पार पडला. या दोन्ही सामन्यात क्रिकेट चाहत्यांना षटकारांची बरसात पहायला मिळाली आहे. या दोन सामन्यात मिळून तब्बल 68 षटकारांची बरसात झाली आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या टी20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 190 धावसंख्या उभारताना 13 षटकार मारले.
तर ऑस्ट्रेलियाकडून 191 धावांचा पाठलाग करताना एकमेव ग्लेन मॅक्सवेलने 9 षटकार मारले. याबरोबरच त्याने 113 धावांची शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सने विजयही मिळवून दिला. त्यामुळे या सामन्यात एकूण 22 षटकार मारण्यात आले.
तसेच विंडीज विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या सामन्यात तर एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रमही झाला आहे. या सामन्यात तब्बल 46 षटकार मारण्यात आले.
या वनडे सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 418 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये इंग्लंडने 24 षटकार मारले. तर इंग्लंडने दिलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांनीही आक्रमक फलंदाजी करताना 22 षटकारांची बरसात केली. मात्र त्यांचा डाव 48 षटकातच 389 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने 29 धावांनी विजय मिळवला.
या खेळाडूंनी मारले बुधवारी झालेल्या सामन्यात षटकार-
भारत –
4 षटकार -केएल राहुल
6 षटकार – विराट कोहली
3 षटकार – एमएस धोनी
ऑस्ट्रेलिया –
9 षटकार – ग्लेन मॅक्सवेल
इंग्लंड-
4 षटकार – जॉनी बेअरस्टो
2 षटकार – ऍलेक्स हेल्स
6 षटकार – इयान मॉर्गन
12 षटकार – जॉस बटलर
विंडीज-
14 षटकार – ख्रिस गेल
1 षटकार – जॉन कॅम्पबेल
4 षटकार – डॅरेन ब्रावो
1 षटकार – शिमरॉन हेटमेयर
2 षटकार – कार्लोस ब्रेथवेट
महत्त्वाच्या बातम्या-
–टी२० क्रमवारीत विराट नाही तर हा एकमेव भारतीय फलंदाज आहे टॉप टेनमध्ये!
–‘आपल्याच कॅप्टनला स्लेज करणार?’ कोहलीचा बुमराहला प्रश्न, पहा व्हिडिओ
–एमएस धोनीने स्विकारलं रिषभ पंतचे ते चॅलेंज, पहा व्हिडिओ