आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे खेळाडूंंनी आणि संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच आयपीएलचे प्रमोशन करण्यासाठी खेळाडूंनी एकमेकांना दिलेल्या आव्हांनाचे व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
असाच एक व्हि़डिओ मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यात दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला आव्हान देतानाही दिसला होता. पण आता या व्हि़डिओचा पुढील भागही प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात धोनीने पंतचे आव्हान स्विकारताना त्याला उत्तरही दिले आहे.
या व्हिडिओमध्ये धोनी पंतचे आव्हान स्विकारताना म्हणत आहे की, ‘मी जेव्हा सुरुवातीला मैदानात उतरलो होतो तेव्हा असाच विचार केला होता. रिषभ ये, विकेटच्या मागे तर मीच असणार आहे. तूचा खेळ दाखवं आणि नाव मिळवं’
https://twitter.com/StarSportsIndia/status/1101013271086288896
त्याआधी या व्हिडिओच्या सुरुवातीला पंत धोनीबद्दलची वर्तमान पत्रातील कात्रणे चिकटवलेली एक वही घेऊन धोनीचे कौतुक करताना दिसत आहे.
तसेच तो यात म्हणतो ‘माही भाई गुरुच्या समान आहेत. जर माही भाई नसता तर माहित नाही मी यष्टीरक्षक फलंदाज बनलो असतो की नाही, नसतो झालो. पण यावेळी मी त्याच्या संघावर असा तूटून पडेन की कॅप्टन कूल, कूल राहणार नाही. त्यामुळे माही भाई तयार रहा मी माझा खेळ दाखवण्यासाठी येत आहे.’
याआधी या व्हिडिओचा पहिला भाग रिषभ पंतनेही ट्विटरवर शेअर केला होता. तसेच त्याने ट्विट केले आहे की ‘माही भाई, सर्वकाही तूझ्याकडूनच शिकलो आहे तर तूझ्यासमोर खेळ दाखवला पाहिजे ना.’
https://twitter.com/RishabPant777/status/1099215579838406656
पंत आणि धोनीसाठी 2018 चा आयपीएल मोसम चांगला गेला होता. पंतने 2018 च्या आयपीएलमध्ये 684 धावा केल्या होत्या. तसेच तो 2018 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याने 5 अर्धशतकेही केली होती आणि सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 128 धावांची शतकी खेळी केली होती.
त्याचबरोबर धोनीने 2018 च्या आयपीएलमध्ये 3 अर्धशतकांसह 455 धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपदही मिळवले होते.
यावर्षीच्या आयपीएलची सुरुवात 23 मार्चपासून होत असून पहिल्या दोन आठवड्यातील 17 सामन्यांचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. तर दिल्लीचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध 24 मार्चला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टॉप १०: टी२० मालिका पराभूत झाली पण भारतीय खेळाडूंनी केले हे खास विक्रम






