भारतीय पुरूषांचा क्रिकेट संघ ९ जूनपासून घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्धचा एकमेव कसोटी सामना १ ते ५ जुलै दरम्यान खेळला जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये दिनेश कार्तिकने तीन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तर शिखर धवनची निवड न झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
“अजूनही धवनची संघाला आवश्यकता आहे”, असे म्हणत राजकुमार शर्मा यांनीही त्याला संघात नाही घेतले म्हणून संघ निवडकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. शर्मा हे रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली संघाकडून खेळले आहेत.
मे महिन्यात संघाची घोषणा करण्यात आली त्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)(IPL) २०२२च्या हंगामात चांगली कामगिरी केलेल्या सर्वाधिक खेळाडूंना संधी दिली आहे. माध्यमांतील भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी धवनला (Shikhar Dhawan) मर्यादित षटकाच्या क्रिकेटसंघात त्याला संधी मिळणार नाही, अशी माहिती दिली आहे.
“डावखुरा फलंदाज धवन हा एक चांगला सलामीवीर आहे. खेळपट्टीवर फलंदाजीसाठी डावे-उजवे कॉम्बिनेशन फायद्याचे ठरते. तो फलंदाजीला आला असता लवकरच खेळपट्टीवर टिकून मोठे शॉट्स मारतो. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेटही उत्तम असतो”, असे शर्मा यांनी म्हटले आहे.
“वय हा एक आकडा आहे. तर धवन अजूनही तंदुरूस्त असून त्याच्याकडे अनुभव आहे. त्यातच टी२० विश्वचषक जवळ आला असून त्याला संघात संधी मिळणार की नाही हे महत्वाचे असेल,” असेही शर्मा म्हणाले आहे.
या हंगामात धवन पंजाब किंग्जकडून खेळला. यामध्ये त्याने उत्तम कामगिरी करत १४ सामन्यांत ३ अर्धशतकांच्या जोरावर ४६० धावा केल्या आहेत. तसेच त्याने सलग सात आयपीएल हंगामात ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. धवनने जुलै २०२१मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. यावेळी त्याने संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याला संघात जागा मिळाली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या खराब कामगिरीवर हळहळला पोलार्ड, भावूक पोस्ट लिहीत म्हणाला, ‘नुकसानीचा अंदाज लावणे कठीण’
पाच खेळाडूंच्या जीवावर गुजरात टायटन्स झाली IPL 2022 विजयाची शिल्पकार, पाहा कोण आहेत ते?
भारीच ना! IPLचा शेवट होताच श्रेयस अय्यरने खरेदी केली लग्झरी कार, किंमत वाचून तोंडात घालाल बोटे