भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने सोमवारी (3 जुलै) म्हणजेच गुरुपैर्णिमेदिवशी रमाकांत आचरेकरांची आठवण काठली. रमाकांत आचरेकर म्हणजे सचिन तेंडुलकरला घडवण्यात सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारे व्यक्तिमत्व. सचिन अगदी लहानपणापासून त्यांच्या मार्गदर्शनात क्रिकेट खेळला.
रमाकांतर आचरेकार (Ramakant Achrekar) यांच्या क्रिकेट अकादमीतून भारतीय संघाला अनेक दिग्गज क्रिकेटपटू मिळाले. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्यांपैकीच एक. सोमवारी गुरु पौर्णिमेचं औचित्य साधून सचिनने त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांची आठवण काढली. आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून सचिनने ही पोस्ट शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शिक्षकांमुळे फरक पडतो, वर्गामुळे नाही. – मायकल मोरपुर्गो.” सचिनने या पोस्टमध्ये आचरेकर सरांच्या अकादमीत असेलेल्या भारतीय खेळाडूंचा फोटोही शेअर केला आहे. सचिनने कॅप्शनमध्ये पुढे लिहिले आहे की, “आम्ही सर्वजण आचरेकर सरांच्या महान क्रिकेट अकादमीचा भाग होतो. त्यांच्यासारख्या निःस्वार्थी व्यक्तिकडून क्रिकेट शिकलो, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.”
"It's the teacher that makes the difference, not the classroom." –Michael Morpurgo.
We were all part of Achrekar Sir’s great school of cricket and I feel most fortunate that I could learn the game from a selfless person like him.
Happy Guru Purnima!#GuruPurnima pic.twitter.com/1Nz2XxvQk7— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 3, 2023
दरम्यान आचरेकर सरांच्या क्रिकेट अकादमीत आजपर्यंत जे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू होऊन गेले, त्यांचा फोटो सचिनने हा पोस्टमध्ये शेअर केला आहे. “आचरेकर सर्स स्कुल ऑफ क्रिकेट,” असा मथळा या फोटोवर आहे. रामनाथ पारकर, बलविंदर सिंग सिंधू, लालचंद राजपूत, चंद्रकांत पंडित, प्रवीण आंब्रे, पारस म्हांबरे, वनोद कांबळी, समीर दिघे, संजय बांगर, सचिन तेंडुलकर आणि रमेश पोवार, या माजी दिग्गजांचे फोटो या पोस्टमध्ये आहेत. हे सर्वजण भारतीय संघाचे महत्वाचे खेळाडू राहिले आहेत. यातील बहुतांशजण आज भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या जबाबदारी पार पाडत आहेत. (On the occasion of Gurupurnima, Sachin Tendulkarne remembered Ramakant Achrekar)
महत्वाच्या बातम्या –
Ashes 2023 । हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा! दोन प्रमुख खेळाडू संघातून आउट
गुरुपौर्णिमा विशेष: ‘या’ दिग्गजांनी निभावली टीम इंडियाच्या गुरुची भूमिका, कोणी हिट तर, कोणी फ्लॉप