---Advertisement---

भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर

---Advertisement---

टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा भारतीय संघाचा मार्ग अजूनही अडचणींनी भरलेला आहे, अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर एका पत्रकाराने उपकर्णधार रोहित शर्माला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, त्याने अतिशय सडेतोड उत्तर दिले.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध जोरदार पुनरागमन करत ४७ चेंडूत ७४ धावा ठोकल्या होत्या. रोहितने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा आहे.

एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला रोहितने आपल्या हजरजबाबी शैलीत उत्तर दिले. उपांत्य फेरीचा रस्ता सध्या भारतासाठी अवघड आहे, पण अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान संघाच्या शक्यतेबद्दल विचारले असता रोहित म्हणाला, ‘तुम्ही अंतिम सामन्याबद्दल बोलत आहात, जे अजून आमच्यासाठी खूप दूर आहे. आम्ही आत्ता इतका विचार करत नाही आहोत. आम्हाला पुढील सामन्याचा विचार करावा लागेल आणि त्यानंतर अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेन. त्यामुळे अंतिम सामना हे अजून दूरचे स्वप्न आहे.’

भारताने पहिले दोन सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध गमावले आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानविरुद्ध संघाला शानदार विजय मिळाला. या विजयानंतर भारतीय संघाच्या नेट रनरेटमध्येही सुधारणा झाली आहे.

चार वर्षांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या आर अश्विनने अफगाणिस्तानविरुद्ध चार षटकांत १४ धावा देत दोन विकेट घेतल्या. सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘तो एक महान गोलंदाज आहे आणि यात शंका नाही. त्याने खूप क्रिकेट खेळले आहे आणि अनेक विकेट्स घेतल्या आहेत. तीन-चार वर्षांनी तो मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत असल्याने त्याच्यासाठी हे आव्हान असणार आहे हे त्याला माहीत होते.’

रोहित पुढे म्हणाला, ‘अश्विन नेहमी विकेटच्या शोधात असतो आणि त्याच्यासारखा खेळाडू संघात असणे हा एक फायदा आहे. त्याची त्याच्या गोलंदाजीवर चांगलीच पकड आहे आणि त्याने आयपीएलमध्येही चमकदार गोलंदाजी केली. आशा आहे की तो भविष्यातही आमच्यासाठी अशीच गोलंदाजी करत राहील.’

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत-स्कॉटलंड सामन्यादरम्यान कसे असेल दुबईचे हवामान? घ्या जाणून

दीपक चाहरची बहीण करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण, ‘या’ तमिळ चित्रपटात झळकणार

आयपीएलमधील दमदार कामगिरीचे फळ! ‘या’ ३ युवा भारतीय खेळाडूंना मिळू शकते न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---