भारतीय संघाने ९० च्या दशकात अनेक मोठमोठे विजय मिळवले आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारखे स्टार फलंदाज त्यावेळी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होते. क्रिकेट चाहते आपल्या यशात सहभागी होतात जल्लोष साजरा करतात. तसेच ते पराभव झाल्यानंतर आपल्या आक्रोश देखील करत असतात. असाच आक्रोश आजच्या दिवशी दाखवला गेला होता. आजच्या दिवशी २५ वर्षाअगोदर भारतीय संघाने कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन तोडत निराशाजनक कामगिरी केली होती.
त्यावेळी वेस्ट इंडिज संघ खूप बलाढ्य संघ मानला जायचा. वेगवान गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी ही त्यांची ओळख होती. आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकरच्या हाती होते तर वेस्ट इंडिज संघाची धुरा ब्रायन लाराच्या हाती होती. पहिले दोन कसोटी सामने ड्रॉ झाले असताना भारतीय संघाला हा सामना आपल्या नावावर करायचा होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या दिशेने लागला होता. सचिनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
विंडीज संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या फलंदाजांना वेंकटेश प्रसाद आणि डोडा गणेश यांनी लवकर माघारी धाडले. चंद्रपॉलच्या शतकी खेळीमुळे वेस्ट इंडिज संघाने २९८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी ३१९ धावा केल्या होत्या. यात सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली होती.तसेच राहुल द्रविडने ७८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी साठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. वेस्ट इंडिज संघ अवघ्या १४० धावांवर सर्वबाद झाला होता. यात भारतीय संघाकडून पहिला सामना खेळत असलेल्या अभय कुरूविला याने ५ गडी बाद केले होते. तसेच वेंकटेशला ३ आणि डोडा गणेशला २ गडी बाद करण्यात यश आले होते.
अवघ्या १२० धावांची होती गरज
भारतीय संघाने पहिल्या ३ डावात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १२० धावांची गरज होती. पहिल्या डावात ३१९ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांना हे आव्हान छोटे वाटू लागले होते. परंतु भारतीय फलंदाजांच्या विकेट्स पत्त्याचा बंगला कोसळावा अशा कोसळल्या. वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची एकही संधी दिली नाही.
अवघ्या ३५.५ षटकात वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाला सर्वबाद करत हा सामना आपल्या नावावर केला होता. भारतीय संघाकडून व्हीव्हीएस लक्ष्मणची १९ धावांची खेळी वगळता कोणत्याही फांदाजाला १० धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. नवजोत सिद्धू ३, राहुल द्रविड़ २, सचिन तेंदुलकर ४, सौरव गांगुली ८, मोहम्मद अजहरुद्दीन ९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ अवघ्या ८१ धावांवर सर्वबाद झाला होता. या पराभवानंतर चाहत्यांनी प्रचंड आक्रोश व्यक्त केला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनची २१ वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी
जिंकली बेंगलोर पण चर्चा कोलकाताच्या हुकमी गोलंदाजाची, IPL इतिहासात नोंद होणारा केला रेकॉर्ड