भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अनिल कुबंळेने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला होता. मात्र आजच्याच दिवशी १५ वर्षांपुर्वी १० ऑगस्ट २००७ साली इंग्लंड संघ अनिल कुंबळेच्या फलंदाजीमुळे चांगलाच अडचणीत सापडला होता.
भारत-इंग्लंड यांच्यातील ओव्हल येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अनिल कुंबळेने शतक झळकावले होते. त्यावेळी तो भारताकडून कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक करणारा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला होता. यावेळी कुंबळे ३६ वर्षे आणि २९६ दिवसांचा होता. तसेच सर्व प्रकारचे ३८९आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर कुंबळेला आपले पहिले कसोटी शतक करण्यात यश आले होते.
या सामन्यात कुंबळेने १९३ चेंडूत नाबाद ११० धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने १ षटकार आणि १६ चौकार मारले होते. त्याचबरोबर गोलंदाजीतही कुंबळेने चमकदार कामगिरी करत पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात २ बळी मिळवले होते.
हा सामना अखेर अनिर्णित राहिला होता. अनिल कुंबळेच्या त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
#OnThisDay in 2007 📅@anilkumble1074 scored his only international century for India with a knock of 110* against England at The Oval in the third Test 👏
His innings helped the visitors draw the match and win the three-match series 1-0 🙌 pic.twitter.com/vKUuxTSuf9
— ICC (@ICC) August 10, 2021
संक्षिप्त धावफलक-
भारत पहिला डाव: सर्वबाद 664 धावा
इंग्लंड पहिला डाव: सर्वबाद 345
भारत दुसरा डाव: 6 बाद 180 घोषीत
इंग्लंड दुसरा डाव: 6 बाद 369
सामनावीर: अनिल कुंबळे (5 विकेट , 118 धावा )
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! न्यूझीलंड बोर्डाचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टला ‘धक्का’, केंद्रीय करारातून केले बाहेर
इन्ज्यूरी, कोरोना अन् पुनरागमन! केएल राहुल तब्बल ९ महिन्यानंतर दिसणार मैदानावर