---Advertisement---

क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या 24 वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव

On: गुरूवार, मार्च 23, 2023 7:42 AM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक अविस्मरणीय गोष्टी घडल्या आहेत. अशा घटना चाहत्यांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. त्यातील काही चाहत्यांना खुप आनंद देणाऱ्या आहेत. तर काही दु:खद आहेत. अशीच एक दु:खद घडना 20 वर्षांपूर्वी 23 मार्च 2002 रोजी घटली होती. त्यादिवशी इंग्लंड क्रिकेट संघावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

23 मार्च 2002 रोजी वेलिंग्टन मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात होता. या सामन्यात लंचच्या वेळी जेव्हा कर्णधार नासिर हुसेन ड्रेसिंग रूममध्ये गेला. तेव्हा त्याने पाहिले होते की,सर्व खेळाडू गुमसुम बसले होते. त्यावेळी त्यांना बेन होलियोक याचे निधन झाले असल्याची बातमी मिळाली होती. बेनची आज 21 वी पुण्यतिथी आहे.

ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या पण नंतर इंग्लंडकडून खेळलेल्या बेन होलियोक याचे नाव त्यावेळच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मध्ये घेतले जात होते. त्याचा अवघ्या 24 व्या वर्षी कार अपघातात मृत्यू झाला होता. पर्थमध्ये होलियोकची कार त्याच्या बालपणीच्या शाळेच्या भिंतीला जाऊन धडकली होती. या घटनेने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेले होते. तो कार मधून प्रवास करत कौटुंबिक सोहळ्याला हजेरी लावण्यास जात असताना हा अपघात झाला होता. तसेच सर्वात कमी वयात प्राण गमावणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू ठरला होता.

त्याने 1996 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यार्कशायर संघाकडून खेळताना त्याने 4 गडी बाद केले होते. त्यानंतर वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्याला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती.त्याने या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 48 चेंडूत 63 धावांची खेळी केली होती.या खेळीच्या जोरावर त्याने सामनावीर पुरस्कार देखील पटकावला होता.

बेन होलियोक याची कारकीर्द
बेन होलियोक याने इंग्लंड संघासाठी 20 वनडे सामने खेळले होते. यात त्याने 309 धावा केल्या होत्या. यासोबतच त्याने 8 गडी देखील बाद केले होते. तसेच 2 कसोटी सामन्यात त्याला अवघ्या 44 धावा करता आल्या. यासोबतच त्याने 4 गडी बाद केले होते. 136 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 2481धावा करत 142 गडी बाद केले होते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. 75 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 2694 धावा केल्या होत्या. यामध्ये 3 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रतिभा असूनही भारतीय संघासाठी दुसरी संधी न मिळालेला कमनशिबी शिलेदार ‘अतुल वासन’
विराटची फिफ्टी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव; टीम इंडियाला मालिकेवरही सोडावं लागलं पाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---