‘फिरकीचा जादूगर’ अशी ओळख असणाऱ्या शेन वॉर्न यांनी 2 डिसेंबर, 1992 साली आपले कसोटी पदार्पण केले होते. भारताविरुद्ध सिडनी येथे झालेल्या या सामन्यात वॉर्न यांना फारशी उत्तम कामगिरी करता आली नाही. वॉर्न यांना आपल्या पहिल्या सामन्यात केवळ एक बळी मिळवता आला होता. गमतीशीर बाब म्हणजे वॉर्न यांनी या सामन्यात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बाद केले होते.
वॉर्न संपूर्ण सामन्यामध्ये संघर्ष करताना दिसत होते. त्यांना एकही बळी मिळवता येणे अवघड जात असतानाच, त्यांनी रवी शास्त्री यांना चकवले. मोठा फटका मारण्याच्या नादात रवी शास्त्री डीन जोन्सकडे झेल देत बाद झाले. पहिला बळी मिळाल्यानंतर वॉर्न यांच्या चेहऱ्यावरील समाधान स्पष्टपणे जाणवत होते. वॉर्न यांनी या पूर्ण सामन्यात 150 धावा देत केवळ 1 बळी मिळवला होता.
आपल्या पहिल्या सामन्यात जरी वॉर्न यांना विशेष कामगिरी करता आली नाही, मात्र पुढे त्यांनी आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक यशाची शिखरे गाठली.
वॉर्न यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियर मध्ये 1001 बळी मिळवले आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 709 तसेच वन-डे क्रिकेटमध्ये 293 बळी मिळवले आहेत. वॉर्न कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिले खेळाडू होते, ज्यांनी 700 बळींचा टप्पा पूर्ण केला होता. अशा या फिरकीच्या जादूगरने 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
शेन वॉर्नने १७ वर्षांपूर्वी कसोटीमध्ये केला होता ‘ऐतिहासिक’ पराक्रम, इंग्लंडचा ट्रेस्कोथिक ठरला होता ‘विक्रमी’ बळी
वॉर्नने क्रिकेटविश्व गाजवल खरं, मात्र पहिल्या सामन्यात शास्त्रींनी केलेली धुलाई तो विसरला नाही
विराटच्या 5 लाडल्यांचा रोहितच्या टीम इंडियातून पत्ता कट! पाहा कोण आहेत ते