भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 19 सप्टेंबर हा दिवस खास आहे. याच दिवशी तब्बल 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 19 सप्टेंबर 2007 साली युवराज सिंग याने एका षटकात सहा षटकार मारले होते. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवारजने हा पराक्रम केला. स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेल्या या षटकात युवराजने सलग सहा षटकार मारले आणि संघाला विजय देखील मिळवून दिला होता.
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हर्शल गिब्स याच्यानंतर युवराज सिंग (Yuvraj Singh) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला होता. 2007 साली आयसीसी टी-20 विश्वचषकाचा पहिलाच हंगाम खेळला जात होता. हंगामातील 21 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता. सामन्यातील 18 व्या षटकात एंड्र्यू फ्लिंटॉफ गोलंदाजी करत होता आणि त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या युवारजसोबत त्यांचा वाद झाला.
#OnThisDay in 2007, Yuvraj Singh v Stuart Broad 🍿🍿🍿
Describe this innings in one emoji!#T20TakesOff
— ICC (@ICC) September 19, 2020
वाद जरी फ्लिंटॉफसोबत झाला असला, तरी त्याचे परिणाम स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याला भोगावे लागले. भारताच्या डावातील 19 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या ब्रॉडला युवाराचने चांदणे दाखवले. या षटकातील सर्वच्या सर्व चेंडू युवराजने सीमारेषेपार पाठवले आणि खास विक्रम देखील केला. षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर त्याने तीन षटकार मारल्यानंतर इंग्लंड संघाची चिंता स्पष्टपणे दिसू लागली. त्यानंतर संघातील अनेकांना ब्रॉडला गोलंदाजीसाठी सल्ले दिले, पण पुढच्या तीन चेंडूंवर युवारजने जे करायचे ते केलेच. या सहा षटकारांच्या जोरावर युवारने अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जो विक्रम आजही अबाधित आहे.
On this day in 2007, Yuvraj Singh smashed 6 "sixes" in an over against Stuart Broad in the T20 World Cup 2007.pic.twitter.com/3HNpwHSOzR
— Johns. (@CricCrazyJohns) September 18, 2022
सामना संपल्यानंतर युवराजने सांगितले होते की, फ्लिंटॉसने त्याच्यासोबत वाद घाला, जो खूप गंभीर होता. याच रागात त्याने हे सहा षटकार मारल्याचेही तो म्हटला होता. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने त्या सामन्यात 4 बाद 218 धावा केल्या आणि इंग्लंडला 18 धावांनी मात दिली. अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने त्यांचा पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
LLC: भिलवाडा किंग्सच्या विजयात कॅरेबियन्स चमकले! युसुफची पुन्हा मॅचविनिंग खेळी
VIDEO: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी थिरकले हार्दिक-विराट; तुम्हालाही आवडेल डान्स
BREAKING: शानदार सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाची इंग्लंडवर मात; स्मृतीचे शतक हुकले