जगातील सर्वात महान कर्णधारांच्या सूचीतील एक मोठे नाव म्हणजेच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली. आजचा दिवस सौरव गांगुली आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास आहे. कारण २२ जून १९९६ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते. १९९२ साली वनडेद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर तब्बल ४ वर्षांनी त्याला कसोटीत संधी मिळाली होती.
गांगुलीने २० जून १९९६ रोजी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने एक जोरदार शतक ठोकले होते. इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर त्याने ही कामगिरी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना गांगुलीने १३१ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने ३०१ चेंडूंचा सामना करत २० चौकारही मारले होते. हा सामना २० जून रोजी चालू झाला होता. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गांगुली फलंदाजीला आला आणि त्याचे शतक सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पूर्ण झाले. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व मोहम्मद अझहरुद्दीन करत होते.
माइक एथर्टनच्या नेतृत्वखाली इंग्लंड संघाने आपल्या पहिल्या डावात ३४४ धावा बनवल्या होत्या. त्यात यष्टीरक्षक फलंदाज जॅक रसेलची १२४ धावांची शतकीय खेळी खास होती. याव्यतिरिक्त ग्राहम थोर्पने १७८ चेंडूंमध्ये १० चौकारांसह ८९ धावांचे योगदान दिले होते. गोलंदाजीमध्ये भारतीय गोलंदाज वेंकटेश प्रसादने उत्कृष्ट प्रदर्शन करत ७६ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त जवागल श्रीनाथने ३ तर गांगुलीने २ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर गांगुलीने आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवत ३०१ चेंडूत २० चौकांसह १३१ धावांची खेळी करून आपल्या पदार्पणाच्या सामन्याला अविस्मरणीय बनवले होते. बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्याया खेळाडूने संयमाने फलंदाजी करत आपल्या खेळीची सुरवात केली होती. अखेर गोलंदाज मुलालीने त्रिफळाचित केल्यानंतर तो सहाव्या विकेटच्या रुपात पॅवेलियनमध्ये परतला होता.
राहुल द्रविडचे या सामन्यात शतक हुकले होते. त्याने २६७ चेंडूत ६ चौकारांसह ९५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पहिल्या डावात ४२९ धावा बनवल्या होत्या. प्रत्युत्तरात सामन्याच्या अंतिम दिवशी इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ९ विकेट गमावत २७८ धावा बनवल्या आणि अशाप्रकारे हा सामना अनिर्णित राहिला. जॅक रसेल या सामन्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.
विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष ४९ वर्षीय गांगुलीने आपल्या कारकिर्दीमध्ये ११३ कसोटी सामने आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आहे. गांगुलीने कसोटीमध्ये ३५ अर्धशतक आणि १६ शतक ठोकत एकूण ७२१२ धावा बनवल्या होत्या. एकदिवसीय सामन्यात त्यांनी ७२ अर्धशतक आणि २२ शतक झळकावले आहे आणि एकूण ११३६२ धावा केल्या होत्या. मध्यमगतीने गोलंदाजी करताना गांगुलीच्या नावे कसोटीमध्ये ३२ तर एकदिवसीय सामन्यात १०० विकेट्स आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
‘ट्वीटरपेक्षा स्वतःच्या प्रदर्शनावर जास्त लक्ष दे’, दक्षिण आफ्रिकी दिग्गजाचा तेवतियाला खोचक टोला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० वर्षानंतर प्रथमच श्रीलंका संघाने रचला ‘हा’ इतिहास