आज एकवर्षांपूर्वी भारताचा कॅप्टनकूल एमएस धोनी(MS Dhoni) 200 वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा पहिला कर्णधार ठरला होता.
त्याने 25 सप्टेंबर 2018 ला एशिया कप स्पर्धेत सुपर फोर फेरीतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात झालेल्या वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. हा त्याचा कर्णधार म्हणून 200 वा वनडे सामना होता.
विशेष म्हणजे धोनीने जानेवारी 2017 मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद(Captaincy) सोडले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे(Virat Kohli) भारताची धूरा सोपवली आहे.
पण त्या एशिया कप स्पर्धेत विराटला विश्रांती देण्यात आली होती. तर या स्पर्धेतील भारताचे प्रभारी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि प्रभारी उपकर्णधार शिखर धवन(Shikhar Dhawan) यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती घेतली होती.
त्यामुळे धोनीने जवळजवळ दिडवर्षांनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळले होते.
त्यावेळी धोनी 200 वनडे सामन्यात नेतृत्व करणारा एकूण तिसराच क्रिकेटपटू ठरला होता. त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग(Ricky Ponting) आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेंमिंग (Stephen Fleming) यांनी 200 पेक्षा जास्त वनडे सामन्यात त्यांच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले होते.
पॉटिंगने 230 वनडे सामन्यात तर फ्लेमिंग यांनी 218 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे.
धोनीसाठी हा सामना खास असला तरी ह्या सामन्यात भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले होते.
या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 252 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 253 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 49.5 षटकात सर्वबाद 252 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला होता.
सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार-
230 सामने – रिकी पॉटिंग
218 सामने – स्टिफन फ्लेमिंग
200 सामने – एमएस धोनी
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या खेळाडूंकडून भारतीय क्रिकेटपटूंना मिळते फिटनेससाठी प्रेरणा, कोहलीने केला खूलासा
–…म्हणून ‘कॅप्टनकूल’ धोनीला आठवले शाळेचे दिवस, पहा व्हिडिओ
–जसप्रीत बुमराहने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिली अशी भावूक प्रतिक्रिया