२६ मे २०१३. हा तोच दिवस, ज्या दिवशी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. आजपासून ७ वर्षांपुर्वी खेळल्या गेलेल्या आयपीएल अंतिम सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला २३ धावांनी पराभूत केले होते. On This Day Mumbai Indians Won Ipl Final Against Chennai Super Kings
कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या ऐतिहासिक सामन्यात मुंबई इंडियन्सने २० षटकात ९ बाद १४८ धावा केल्या होत्या. मात्र, चेन्नई सुपर किंग्सला २० षटकात केवळ १२५ धावाच करता आल्या. चेन्नईमागच्या पराभवाचे कारण एक तर त्यांची खराब फलंदाजी होती. मात्र, दुसरे कारण कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांची रणनीती हेही होते.
मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसे तर, मुंबईची सुरुवात जास्त चांगली झाली नव्हती. पहिल्या ४ षटकात ड्वेन स्मिथ ४ आणि रोहित २ धावांवर बाद झाला होता. फलंदाज आदित्य तरे शून्यावर बाद झाला होता. मात्र, दिनेश कार्तिक आणि अंबाटी रायडूने पुढे वेगाने धावा घेण्यास सुरुवात केली. तरी, कार्तिक २१ धावांवर आणि रायडू ३७ धावांवर बाद झाला होता. तेव्हापर्यंत संघाच्या ५ बाद १०० धावा झाल्या होत्या.
अखेर, मुंबई इंडियन्सचा केराॅन पोलार्डने ६व्या क्रमांकावर फलंदाजी करत ३२ चेंडूत नाबाद ६० धावा केल्या होत्या. यात त्याच्या ३ चौकारांचा आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्यामुळे मुंबईने २० षटकात चेन्नईला १४९ धावांचे आव्हान दिले होते.
चेन्नई सुपर किंग्सने मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच मायकल हसी आणि सुरेश रैनाची विकेट गमावली होती. दुसऱ्या षटकात सुब्रह्मण्यम बद्रीनाथही शून्यावरच बाद झाला होता. पुढे ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा आणि मुरली विजयही चांगले खेळू शकले नव्हते. ७.३ षटकात चेन्नईने ६ बाद ३९ धावा केल्या होत्या.
पुढे एल्बी मॉर्कलने आणि क्रिस मॉरिसने कशाबशा संघाच्या एकूण ५८ धावा केल्या. त्यानंतर धोनीने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. १८व्या षटकापर्यंत आर अश्विनची विकेट गेली. मात्र, धोनीने शेवटपर्यंत टिकून ४५ चेंडूत ६३ धावा केल्या होत्या. तरीही त्याचा संघ १२५ धावाच करु शकला आणि मुंबईने चषकावर आपले नाव कोरले.
धोनीने यावेळी एक सर्वात मोठा चुक केली, ती म्हणजेतो ७व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याने त्याच्यापुर्वी जडेजा आणि ब्रावोला पाठवून चूक केली. तसेच, प्रशिक्षक फ्लेमिंग यांचा हा विश्वास होता की, धोनीने ७व्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाला अनेक सामने जिंकून दिले होते. त्यामुळे त्याने ७व्या क्रमांकावरच फलंदाजी करावी.
ट्रेंडिंग घडामोडी-
‘संघसहकाऱ्यांंना वडील हाकलून द्यायचे घराबाहेर; म्हणायचे…