fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

८ वर्षांपुर्वीच्या डेक्कन चार्जर्स व सध्याच्या सनराइजर्स हैद्राबादमधील ५ गमतीशीर साम्य

5 Similarities Between Sunrisers Hydrabad And Deccan Chargers

आयपीएल इतिहासात हैद्राबादचे २ संघ होते. २००८ ते २०१२पर्यंत डेक्कन चार्जर्स आणि २०१३पासून ते आतापर्यंत सनराइजर्स हैद्राबाद अशी या २ संघांची नावे आहेत. या दोन्ही संघांनी १-१वेळा आयपीएलचे विजेतेपद भूषवले आहे.

डेक्कन चार्जर्सने २००९ला दक्षिण आफ्रिकामध्ये झालेला आयपीएलचा दुसरा हंगाम जिंकला होता. तर, सनराइजर्स हैद्राबादने २०१६मध्ये आयपीएलचा ९वा हंगाम जिंकला होता. सर्वांना चकित करणारी गोष्ट अशी की, २००९ आणि २०१६मध्ये आयपीएलचे विजेतेपद भूषवणाऱ्या २ वेगवेगळ्या संघातील बऱ्याच गोष्टीत समानता होती.

या लेखात आपण सनराइजर्स हैद्राबाद आणि डेक्कन चार्जर्स संघात असणाऱ्या त्या ५ समानतेंविषयी जाणून घेणार आहोत. 5 Similarities Between Sunrisers Hydrabad And Deccan Chargers

१. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचे ३ खेळाडू

२०१६ च्या आयपीएल अंतिम सामन्यात सनराइजर्स हैद्राबादमध्ये ऑस्ट्रेलियातील ३ खेळाडूंचा समावेश होता. एक म्हणजे, कर्णधार डेविड वॉर्नर, दुसरा बेन कटिंग आणि तिसरा मोइसेस हेनरिक्स. तर, २००९च्या आयपीएल अंतिम सामन्यातदेखील ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंचा समावेश होता. कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट, एंड्रू सायमंड्स आणि रेयान हॅरिस हे खेळाडू होते.

एंड्रू सायमंड्स आणि मोइसेस हेनरिक्स हे दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये जन्मले नव्हते. सायमंड्स इंग्लंडमध्ये तर हेनरिक्स पोर्तुगालमध्ये जन्मला होता. तर, हॅरिस आणि बेन हे आयपीएलचा अंतिम सामना खेळताना २९ वर्षांचे होते.

२. पर्पल कॅप विजेते

सनराइजर्स हैद्राबादच्या भुवनेश्वर कुमारने आयपीएल २०१६मध्ये २३ विकेट्स घेत, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या युजवेंद्र चहलला (२१) मागे पाडले होते. तसेच, २००९मध्ये डेक्कन चार्जर्सच्या आरपी सिंगने २३ विकेट्स घेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या अनिल कुंबळेला (२१) मागे पाडले होते. त्यामुळे दोघेही पर्पल कॅपचे विजेते बनले होते. शिवाय, दोघेही उत्तर प्रदेशमध्ये जन्मले होते.

३. दोन्ही संघांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत केले 

सनराइजर्स हैद्राबादने २०१६मध्ये अंतिम सामन्यात ८ धावांनी रॉयल चॅलेंजर्सला पराभूत केले होते. हा सामना हैद्राबादने आपल्या मजबूत गोलंदाजीमुळे जिंकला होता. तर, २००९मध्ये डेक्कन चार्जर्सनेही ६ धावांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत केले होते.

४. दोन्ही संघांचे प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे होते

ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी हे सनराइजर्स हैद्राबादचे प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणामुळे आणि संघ निवडीमुळे सनराइजर्स हैद्राबादने ट्रॉफी पटकावली होती. तर, २००९मधील डेक्कन चार्जर्स संघाचे प्रशिक्षक हे ऑस्ट्रेलियाचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन लेहमन हे होते. त्यांच्या प्रशिक्षणामुळे डेक्कन चार्जर्स अंतिम सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरली होती.

मूडी आणि लेहमन हे दोघेही ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज होते. त्यांनी दोघांनीही वनडेत ५२ विकेट्स घेतल्या होत्या.

५. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कर्णधार दुसऱ्या क्रमांकावर 

सनराइजर्स हैद्राबादचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनराइजर्स हैद्राबादने पहिल्यांदा चषकावर आपले नाव कोरले होते. तर, २००९मध्ये ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चारजर्सने विजय मिळवला होता.

हे दोन्ही कर्णधार आपापल्या वेळेला सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांची स्ट्राईक रेटदेखील जवळपास सारखाच होता. अजून पाहायचे झाले तर, दोघांनीही त्यांचे पहिले कसोटी शतक दुसऱ्या सामन्यातच ठोकले होते. तर, त्यांनी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

ट्रेंडिंग लेख-

भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता

विश्वास नाही बसणार पण हे खरंय; जगातील ‘या’ १० महान गोलंदाजांनी कारकिर्दीत एकही…

आयपीएलमध्ये १७० सामने खेळूनही शतक न करता आलेले ५ फलंदाज

You might also like