मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम करत इतिहास घडवला आहे. सचिनने अनेकवर्षे वनडेमध्ये सलामीला फलंदाजी केली आहे. तो भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर फलंदाजही आहे.
विशेष म्हणजे सचिनने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ही सलामीवीर म्हणून केली नव्हती. पण बरोबर २८ वर्षांपूर्वी त्याने पहिल्यांदा सलामीला फलंदाजी केली. झाले असे की २७ मार्च १९९४ ला न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंडला वनडे सामना होणार होता. पण या सामन्याआधी भारताचा नियमित सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धूला मानेची दुखापत झाली होती.
त्यामुळे त्यावेळीचा भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सचिनला सलामीला फलंदाजी करण्यास सांगितले. तेथून सचिनच्या कारकिर्दीला नवीन वळण मिळाले. त्या सामन्यात सचिनने सलामीला फलंदाजीला जात आक्रमक खेळताना ४९ चेंडूत ८२ धावांची खेळी केली.
या सामन्यानंतर सचिनने त्याच्या कारकिर्दीत ३४४ वनडे सामन्यात सलामीवीर म्हणून फलंदाजी केली. या सामन्यांमध्ये मिळून त्याने ४८.२९ च्या सरासरीने १५३१० धावा केल्या. यामध्ये त्याच्या ४५ शतकांचा समावेश आहे.
https://twitter.com/ICC/status/1243409923574083585
तसेच सचिनने वनडेमध्ये ११९ सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी केली आहे. मधल्या फळीत फलंदाजी करताना सचिनने ३३ च्या सरासरीने ३११६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या केवळ ४ शतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धमाकेदार खेळीनंतर सोशल मीडियावर धोनी भाऊचीच चर्चा! चाहते आनंदात
चाळीसाव्या वर्षी धोनीची दहाड! चौकारांनी केली कमाल; उडविले मिनी हेलिकॉप्टर