भारतीय संघात सलामीवीर फलंदाज म्हटलं की सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचं नाव नेहमी येतं. गावस्कर यांच्या आवडत्या खेळाडूबद्दल बोललं, तर ते सुद्धा एक सलामीवीर फलंदाजच होते. एमएल जयसिम्हा (ML Jaisimha) त्यांच्या फलंदाजीसाठी आणि त्यांच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखले जात होते. पण त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे 18 डिसेंबर 1960 ला कानपूरमध्ये पाकिस्तानविरुद्ध जी खेळी केली होती, ती विसण्याचाच सर्वांचा प्रयत्न असेल.
त्यांनी दिवसभर फलंदाजी केली होती. पण ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर त्यांनी फक्त 54 धावा केल्या होत्या. त्यांनी 505 मिनिटे म्हणजे 8 तासांपेक्षा अधिक वेळ फलंदाजी केली. पण दुर्दैवाने धावचीत झाल्याने त्यांचे शतक एका धावेने हुकले होते.
पाकिस्तान संघ 1960 मध्ये 5 कसोटी खेळण्यासाठी दौऱ्यावर आला होता. पहिला कसोटी सामना मुंबईत अनिर्णित झाल्यानंतर संघ कानपूरमध्ये पोहचला. पाकिस्तान पहिल्यांदा फलंदाजी करताना 335 धावांवर ऑल आऊट झाला. त्यामुळे भारतीय कर्णधार नरी काँट्रॅक्टर (Nari Contractor) आणि एमएल जयसिम्हा फलंदाजीला आले. भारत दिवसाखेर 10/0 अश्या धावसंख्येयवर होता. सर्व 10 धावा नरी काँट्रॅक्टर यांनी केल्या होत्या. एमएल जयसिम्हा 0 धावांवर होते. तिसऱ्या दिवशी नरी काँट्रॅक्टर 47 आणि अब्बास अली बेग 13 धावा करून बाद झाले.
जयसिम्हाने दिवसभर खेळून केल्या 54 धावा
तिसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेण्यासाठी एमएल जयसिम्हा सोबत विजय मांजरेकर आले. पण त्यादिवशी जयसिम्हा त्यांच्या फटकेबाजीच्या लयीत नव्हते. दोघांनी दिवसभर फलंदाजी केली. जयसिम्हा 54, तसेच विजय मांजरेकर (Vijay Manjrekar) 36 धावांवर नाबाद परतले. तिसऱ्या दिवसाअखेर भारत 2 बाद 159 धावांवर होता. पुढच्या दिवशी विश्रांती होती. चौथ्या दिवशी जयसिम्हा 99 वर बाद झाले.
शतकासाठी एक चोरटी धाव घेताना जयसिम्हा धावचीत झाले. 505 मिनिटे खेळून त्यांनी 99 धावा केल्या. त्यांनी 12 चौकारसुद्धा मारले. ते पंकज रॉयनंतर 99 वर बाद होणारे दुसरे फलंदाज होते.
जयसिम्हा फसले 99 वर
भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज पंकज रॉय (Pankaj Roy) 1959 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावांत 99 वर बाद झाले होते. एमएम जयसिम्हा पाकिस्तान विरुद्ध 99 वर बाद झाल्यानंतर पंकज रॉय पाठोपाठ अशाप्रकारे बाद होणारे ते दुसरे भारतीय फलंदाज बनले.
जयसिम्हा यांनी 39 कसोटी सामन्यात 2056 धावा केल्या. त्यात 3 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश पण होता. प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी 33 शतकं केली होती.
जयसिम्हाच्या स्टाईलची केली अजहरने नक्कल
कॉलर वर केलेल्या स्टाईलला माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनमुळे (Mohammad Azharuddin) प्रसिद्धी मिळाली असली, तरी याची सुरुवात हैदराबादच्या जयसिम्हा यांनी केली होती. याव्यतिरिक्त त्यांची टाय बांधायची स्टाईल सुद्धा भारी होती. अझहरुद्दीन, गावस्कर सोबत बऱ्याच जणांनी त्यांची स्टाईल कॉपी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बंगळुरू एफसीचा सहज विजय; जमशेदपूर एफसीचा सलग सातवा पराभव
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूच्या हातावर भारताची मेहंदी, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भारीच की..’