---Advertisement---

आनंदाची बातमी! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा होणार ‘दादागिरी’, कसं ते घ्या जाणून

On: शनिवार, जुलै 30, 2022 8:02 PM
Sourav-ganguly-1
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहेत. गांगुली लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये चॅरिटीसाठी एक खास क्रिकेट सामना खेळतील. आपल्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांनी याची घोषणा करताना सांगितले की, आपण लिजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या सत्रात एक अतिशय खास सामना खेळणार आहे. अलीकडेच स्पर्धेच्या आयोजकांनी आगामी हंगाम भारतात आयोजित करण्याची घोषणा केली होती. या निमित्ताने भारतीय क्रिकेट चाहत्यांना सौरव गांगुली यांना क्रिकेट खेळताना पाहण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे.

भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहीले की, ‘स्वातंत्र्याचा महोत्सव.‌ भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त एका चॅरिटी सामन्याकरिता ट्रेनिंग सुरू केली. लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दिग्गजांसोबत महिला सक्षमीकरणासाठी काही चेंडूचा लवकरच सामना करणार आहे.’ यासोबतच गांगुली यांनी जिममध्ये घाम गाळतानाची काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly) 

काही दिवसांपूर्वीच लिजेंड्स लीग क्रिकेटच्या आयोजकांनी गांगुली या स्पर्धेत खेळणार असल्याचे घोषित केले होते.‌ मात्र, गांगुली यांनी तो दावा खोडून काढला होता. आता चॅरिटी सामन्याकरिता गांगुली यांनी होकार दिल्यावर स्पर्धेचे सहसंस्थापक रमन रहेजा म्हणाले,

“अन्य दिग्गजांसह या लीगमध्ये खेळण्यासाठी होकार दिल्याबद्दल गांगुली यांचे धन्यवाद. वन्स लिजेंड ऑलवेज लिजेंड. क्रिकेटसाठी दादा नेहमीच उपलब्ध असतात.‌ एका खास सामन्यात दादा यांना पाहून चाहते नक्कीच उत्साहीत होतील. या सामन्यात काही दादा फटके पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Legends League Cricket (@llct20)

लिजेंड्स लीग क्रिकेकचा दुसरा हंगाम ऑगस्ट महिन्यात खेळला जाईल. यावेळी स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे आयोजन ओमान येथे करण्याचे नियोजित होते. मात्र, अचानक स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‌महत्वाच्या बातम्या-

अश्विनने घेतली कार्तिकची फिरकी! म्हटला, ‘एकेकाळी ब्रायन लारासोबत खेळणारा…’

‘मेयर्सची विकेट, अर्शदीपचं सेलिब्रेशन अन् आयपीएल कनेक्शन!’ भारताच्या माजी दिग्गजाचे स्पष्टीकरण

‘आता क्रिकेटपटूही वापरू लागलेत चायनीज साहित्य?’, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---