इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात गुरुवारी (12 ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या अंतिम ११ मध्ये अनेक बदल केले आहेत. इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण ३ बदल केले आहेत. तर भारतीय संघाने दुखापतग्रस्त असलेल्या शार्दुल ठाकुर ऐवजी ईशांत शर्माला संघात स्थान दिले आहे.
इंग्लंडने डॅन लॉरेन्सच्या ऐवजी हसीब हमीदला आपल्या संघात सामील केले आहे. २४ वर्षाच्या या हसीब हमीदने तब्बल ५ वर्षानंतर इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. याच्या आधी भारताविरुद्धच २६ नोव्हेंबर २०१६ साली हसीब हमीदने त्याचा शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
एकेकाळी हसीब हमीदला त्याच्या लहान शरीरयष्टीमुळे आणि त्याच्या कमजोर तब्येतीमुळे खेळण्यासाठी नाकारण्यात आले होते. वयाच्या १८ व्या वर्षी हसीब हमीदने ‘टोन क्रिकेट क्लब’कडून खेळताना फिरकीपटू म्हणून खेळायला सुरुवात केली होती.
११ वर्षाखालील स्पर्धेत खेळण्यासाठी ‘लंकाशायर’कडून खेळताना ट्रायल दरम्यान कमी उंचीमुळे (छोट्या शरिरयष्टीमुळे) नाकारण्यात आले होते. शेवटच्या फळीत खेळताना हमीदने नाबाद ४८ धावा केल्या होत्या. ज्यानंतर हमीदने गोलंदाजीऐवजी फलंदाजी करण्याचे ठरवले. तसेच याचवर्षी हमीदने सलामीला येऊन फलंदाजी करत त्याचे पहिले शतक देखील ठोकले होते.
हमीदने आतापर्यंत केवळ ४ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ४३.४ सरासरीने २१९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च खेळी ही ८३ धावांची होती. त्याचबरोबर हमीदच्या नावे दोन अर्धशतक देखील आहेत.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत असताना जिंकण्याच्या वाटेवर असताना पाचव्या दिवशी सततच्या पावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना अनिर्णित राहिला
महत्वाच्या बातम्या –
–‘अश्विन दर्जेदार गोलंदाज आहे, विराटची निवड चुकली,’ दिग्गजाची भारताच्या प्लेइंग इलेव्हनला नापसंती
–क्रिकेटच्या पंढरीत ‘हिटमॅन’चा एकच पण कडक षटकार, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळाली जागा
–जेम्स अँडरसनचा आणखी एक कीर्तिमान; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव वेगवान गोलंदाज