भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने रॉयल लंडन एकदिवसीय चषक स्पर्धेत यॉर्कशायरकडून खेळताना वॉर्केस्टशायर विरूध्द शतकी खेळी केली. परंतु या सामन्यात त्याचा संघ यॉर्कशायरला चार धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला.
नाणेफेक जिंकून यॉर्कशायरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वॉर्केस्टशायरने सहा गडी गमावत 350 धावांचे लक्ष्य दिले. वॉर्केस्टशायरकडून ट्रॅव्हीस हेड 77 तर रॉस व्हाइटली नाबाद 66 यांनी दमदार खेऴी केल्या.
प्रत्युत्तरा दाखल यॉर्कशायरकडून खेळणाऱ्या पुजाराने ९४ चेंडूत १०१ धावांची झुंजार खेळी केली. त्यात १० चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. अन्य फलंदाजांमध्ये सलामीला आलेल्या टॉम कोहलरने 89 धावा केल्या. अखेर यॉर्कशायरने नऊ गडी गमावत 346 धावांपर्यंतच मजल मारली. इडी बर्नाडने 75 धावांत 3 बळी मिळवले.
या विजयासह वॉर्केस्टशायरने नॉर्थ ग्रुपमध्ये पहिले स्थान मिळवले. यॉर्कशायर सहाव्या स्थानावर आहे.
पुजाराने या स्पर्धेत ८२, ७३ आणि १०१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–सलग १५३ कसोटी खेळणं सोप नाही, कूकचा क्रिकेटमधील भीमपराक्रम
–प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !
–चेन्नई विरुद्ध कोलकातामध्ये होणार फायनल, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल!
–विराटचं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडलं महागात
–यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!