---Advertisement---

IND vs PAK: भारताचा एकटाच खेळाडू पाकिस्तान संघावर भारी! जाणून घ्या रेकॉर्डस काय सांगतात?

On: शुक्रवार, सप्टेंबर 5, 2025 5:41 PM
Ind vs Pak
---Advertisement---

आशिया कप 2025 स्पर्धा (Asia Cup 2025) 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) एकाच गटात आहेत आणि त्यांचा पहिला सामना 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नशिबाने साथ दिली तर या स्पर्धेत भारत-पाकिस्तान तिन वेळा एकमेकांसमोर येऊ शकतात.

जगातील धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूंमध्ये एक मानला जाणारा हार्दिक पंड्या (Hardik pandya) या आशिया कपसाठी पूर्ण तयारी करत आहे. पाकिस्तानसाठी मात्र तो सर्वात मोठा डोकेदुखी ठरत आहे, कारण सध्याच्या भारतीय संघात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज हार्दिकच आहे. त्यामुळे तो टीम इंडियासाठी या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

हार्दिक पंड्याच्या टी20 करिअरकडे पाहिल्यास, त्याने आतापर्यंत भारतासाठी 114 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 27.87 च्या सरासरीने 1812 धावा केल्या असून पाच अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीतही तो तितकाच प्रभावी ठरला असून 94 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हार्दिक पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो 9 सप्टेंबरला यूएईविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

हार्दिक पंड्या – 13 विकेट

भुवनेश्वर कुमार – 11 विकेट

अर्शदीप सिंह – 7 विकेट

इरफान पठान – 6 विकेट

जसप्रीत बुमराह – 5 विकेट

कधीकाळी रोहित शर्मानंतर भारताचा भविष्यातील टी20 कर्णधार मानला गेलेला हार्दिक पंड्या या वेळच्या आशिया कपमध्ये मात्र फक्त खेळाडू म्हणून सामील झाला आहे. या वेळी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी20 संघाचे नेतृत्व करणार असून शुबमन गिलला (Shubman gill) उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

वनडे क्रिकेटमध्ये हार्दिकने आतापर्यंत 94 सामने खेळले असून 32.82 च्या सरासरीने 1904 धावा केल्या आहेत, त्यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने 91 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 11 सामने खेळले असून 18 डावांत 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि चार अर्धशतके समाविष्ट आहेत. तसेच कसोटीत त्याने 17 विकेट्सही घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---