---Advertisement---

काय सांगता! जास्त फॅन्स आल्यास स्टेडियमचा स्टँड कोसळेल, भारत-बांगलादेश कसोटीसाठी तिकिटांच्या विक्रीवर बंदी

---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार (27 सप्टेंबर) पासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतानं पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर बीसीसीआयनं कानपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी हाच विजेता संघ कायम ठेवण्याची घोषणा केली.

आता कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियम संबंधी एक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, कानपूरच्या स्टेडियमचा एक स्टँड कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशननं त्या स्टँडची तिकिटं न विकण्याचा निर्णय घेतला. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या रिपोर्टनुसार, स्टेडियमची ‘बाल्कनी सी’ अनफिट घोषित करण्यात आली आहे. एकूण 4800 लोकांची क्षमता असलेली बाल्कनी सी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील केवळ 1700 तिकिटांचीच विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सीईओ अंकित चॅटर्जी म्हणाले, “पीडब्ल्यूडीनं काही मुद्दे उपस्थित केले आहेत. आम्ही बाल्कनी सी मधील सर्व तिकिटं विकणार नाही. आम्हाला 4,800 क्षमतेच्या स्टँडसाठी केवळ 1700 तिकिटे विकण्यास सांगण्यात आलंय. दुरुस्तीचं काम पुढील काही दिवस सुरू राहील”.

अहवालानुसार, पीडब्ल्यूडीच्या एका अभियंत्याने सांगितलं की, “हे स्टँड उड्या मारणाऱ्या 50 फॅन्सचं वजन देखील सहन करू शकणार नाही.” स्टेडियमच्या या भागाच्या दुरुस्तीची नितांत गरज आहे.”

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल

हेही वाचा – 

शतकानंतरही इशान किशनला टीम इंडियात संधी मिळणार नाही? जाणून घ्या कारण
VIDEO : पॅट कमिन्सने सुरू केली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तयारी, नेट्समध्ये जबरदस्त घाम गाळला
वीरेंद्र सेहवागची राजकारणात एंट्री? उघडपणे केला या पक्षाच्या नेत्याचा प्रचार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---