---Advertisement---

निर्णयक टी२० सामना जिंकत मालिका खिशात घालण्यावर भारत-श्रीलंकाची नजर, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही

---Advertisement---

भारताचा श्रीलंका दौरा अंतिम टप्प्यावर आला आहे. पहिला टी२० सामना गमावल्यानंतर श्रीलंकाने भारताला दुसऱ्या टी२० सामन्यात ४ विकेट्सने पराभूत केले. हा सामना जिंकत यजमानांनी टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे गुरुवारी (२९ जुलै) होणारा तिसरा आणि अंतिम टी२० सामना निर्णायक असणार आहे. हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्यासाठी उभय संघ प्रयत्नशील असतील.

कधी होणार आहे तिसरा टी२० सामना ?
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा टी२० सामना गुरुवारी अर्थात २९ जुलै रोजी होणार आहे.

कुठे होणार तिसरा टी२० सामना ?
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा टी२० सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

किती वाजता होणार तिसरा टी२० सामना ?
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तत्पुर्वी ७.३० वाजता नाणेफेक होईल.

तिसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या टिव्ही चॅनेलवर पाहाता येईल ?
श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

तिसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
श्रीलंका विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण Sony Liv या ऍपवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ
भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), कुलदीप यादव, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया, वरुण चक्रवर्ती, कृष्णाप्पा गौतम, युजवेंद्र चहल, संदीप वॉरियर, ईशान पोरेल, साई किशोर, अर्शदीप सिंग, सिमरजित सिंह

श्रीलंका संघ – दसून शनका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्ष, पथम निसान्का, चरिथ असलांका, वनिंदू हसरंगा, अशेन बंदरा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रम, असिता फर्नांडो, कसून रजीता, लाहिरू कुमारा, इसुरु उडाना.

महत्त्वाच्या बातम्या-

‘नो लूक थ्रो’! श्रीलंकेच्या गोलंदाजाने यष्टीकडे न पाहताच उडवली दांडी, सर्वांना आठवला धोनी

‘तिचा होकार असल्यास, एका पायावर तयार’; सारासोबत लग्नाच्या प्रश्नावर पाकिस्तानी गोलंदाजाचे भन्नाट उत्तर

आज उजाळणार ‘या’ ४ भारतीय युवकांचे नशीब, श्रीलंकेविरुद्ध करू शकतात टी२० पदार्पण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---