इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात आजवर कित्येक दमदार खेळाडूंनी एकापेक्षा एक जबरदस्त विक्रम नोंदवले आहेत. पण बऱ्याचदा खेळाडूंकडून नकळत काही नकोसे विक्रमही केले जातात. असाच एक नकोसा विक्रम केला आहे, चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकीपटूने. त्याचे नाव आहे ‘पीयुष चावला’.
चावलाने आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत गोलंदाजी करताना ४०००पेक्षाही जास्त धावा दिल्या आहेत. यासह आयपीएल इतिहासात गोलंदाजी करताना ४०००पेक्षाही जास्त धावा देण्याचा नकोसा विक्रम करणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. Only 1 Bowler To Spend More Than 4000 Runs In IPL History
चावलाने आजवर आयपीएलमध्ये १५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७.८२च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करत ४०७२ धावा दिल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोलंदाजाने ४००० पेक्षा जास्त धावा दिल्या नाहीत. चेन्नईचा दिग्गज गोलंदाज हरभजन या यादीत दूसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये १६० सामने खेळत असताना ३९६७ धावा दिल्या आहेत.
असे असले तरी, हा नकोसा विक्रम आपल्या नावावर करणारा चावला हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स चटकावणारा चौथा गोलंदाज आहे. त्याने १५७ सामन्यांपैकी १५६ डावात गोलंदाजी करताना १५० विकेट्स चटकावल्या आहेत. तो हरभजनसोबत
चावलाने २००८ साली किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो पुढे २०१३ पर्यंत पंजाब संघाचा भाग होता. पुढे २०१४ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला विकत घेतले. तेव्हापासून २०१९ पर्यंत तो कोलकाताचा भाग होता. मात्र यावर्षी आयपीएलच्या दूसऱ्या सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्स संघाने चावलाला ६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यामुळे चावला यावर्षी चेन्नईकडून जोरदार प्रदर्शन करताना दिसेल.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पहिला सामना आज (१९ सप्टेंबर) अबु धाबी येथे खेळला जाईल. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-चक्क २० संघांकडून खेळलेला अष्टपैलू आज उतरणार चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात
-सीएसके विरुद्ध मुंबई ड्रीम ११: पहा टीममध्ये कोणाला मिळाली जागा
-काय सांगता! आजपर्यंत आयपीएलमध्ये विराट कोहलीला ‘हा’ गोलंदाज एकदाही करु शकला नाही बाद
ट्रेंडिंग लेख-
-मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ
-८ आयपीएल संघांमध्ये एक एक तरी कमतरता आहेच, पहा कुणाकडे काय नाही
-युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली