---Advertisement---

मूर्ती लहान, पण कीर्ती महान! वयाच्या १३ व्या वर्षी ‘या’ मुलींनी टोकियो ऑलिंपिक्समध्ये रचला इतिहास

---Advertisement---

ऑलिंपिक्सच्या महाकुंभ मेळ्यात जगभरातील दिग्गज खेळाडू इतिहास रचताना आपण अनेकदा पाहिले आहे. त्याच मंचावर आता दोन मुलींनी खूपच कमी वयात इतिहास रचत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. टोकियो ऑलिंपिक्सच्या एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली आहे. जपानच्या मोमीजी निशिया आणि ब्राझीलच्या रेसा लीलने स्केटबोर्डिंगच्या महिला स्ट्रीट खेळात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई करत इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही मुली फक्त १३ वर्षीय आहेत.

जपानच्या मोमीजी निशिया इतिहासातील सर्वात कमी वयाची वैयक्तिक ऑलिंपिक चॅम्पियनपैकी एक खेळाडू बनली आहे. तिने सोमवारी (२६ जुलै) १३ वर्षे आणि ३३० दिवसांच्या वयात महिला स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. दुसरीकडे निशिया ही ब्राझीलच्या रेसा लीलच्या पुढे राहिली आहे. तिचे वय १३ वर्षे २०३ दिवस आहे. (Only 13 Years Old Girls Created History In Tokyo Olympics)

निशियाने १५.२६ इतका स्कोर करण्यासाठी ट्रिक्स विभागात शानदार कामगिरी केली आणि यजमान संघाला स्केटबोर्डिंगच्या स्ट्रीट डिसिप्लीनमध्ये क्लीन स्वीप दिला. ऑलिंपिकमध्ये स्केटबोर्डिंगने सुरुवात केली आहे.

तिच्या या शानदार कामगिरीत जपान संघाची सहकारी युटो होरिगोम याची झलक पाहायला मिळाली, ज्याने रविवारी (२५ जुलै) शानदार सीक्वेन्ससोबत पुरुषांच्या खेळात किताब जिंकला.

https://twitter.com/hunter_mufc/status/1419517278874333184

ऑलिंपिक इतिहासात सर्वात कमी वयात सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम अमेरकिन डायव्हर मार्जरी गेस्ट्रिंगच्या नावावर आहे. तिने १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक्समध्ये १३ वर्षे आणि २६८ दिवसांच्या वयात सुवर्ण पदक जिंकले होते.

आता निशिया स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली खेळाडू बनली आहे.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?

-टेबल टेनिस महिला एकेरीत भारताची मनिका ऑस्ट्रियाच्या सोफियापुढे सपशेल फ्लॉप, नुकतेच केले होते दमदार पुनरागमन

-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---