कोलकाता नाइट रायडर्स हा आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. केकेआरनं शनिवारी मुंबई इंडियन्सचा पराभव करत प्लेऑफचं तिकीट मिळवलं.
या सामन्यात कोलकाताचा उपकर्णधार नितीश राणा यानं दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलं. नितीशनं मुंबईविरुद्ध 23 चेंडूत 33 धावांची खेळी खेळली. या सामन्यात केकेआरनं शेवटच्या षटकात विजय मिळवला. सामन्यानंतर बोलताना नितीश राणा म्हणाला की, संघाच्या यशाचं रहस्य म्हणजे विजय किंवा पराभवाच्या वेळी खेळाडूंची एकजूटता. नितीश म्हणाला की, त्याची टीम गेल्या 2 वर्षांपासून हे करू शकली नव्हती.
दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सनं पावसानं प्रभावित झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. केकेआरला या हंगामात सर्वात मोठा धक्का पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात बसला होता. या सामन्यात पंजाब किंग्जनं कोलकाताच्या घरच्या मैदानावर 262 धावांचं लक्ष्य गाठून नवा विक्रम रचला होता.
या सामन्याबाबत बोलताना नितीश राणा म्हणाला की, “त्या दिवशी आम्हाला खूप वाईट वाटलं. त्या दिवशी ड्रेसिंग रूममध्ये कसं वातावरण होतं हे मी पाहिलं आहे. सामन्यानंतर फक्त तीन-चार खेळाडूंनी जेवण केलं.”
नितीश राणानं बोटाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केलं आहे. तो गेल्या 10 सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. मुंबईविरुद्ध त्यानं 23 चेंडूत 33 धावांची खेळी खेळली. नितीश राणा म्हणाला, “दुखापतीमुळे मी 20-22 दिवस बॅटला हात लावू शकलो नाही. तेव्हा मी मनातल्या मनात मॅच खेळायचो.”
याआधी केकेआरनं 2021 मध्ये शेवटचा प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर या हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. टीमचे गोलंदाज आणि सलामीवीर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. सुनील नारायण आणि फिल सॉल्ट सलामीला येऊन धुमाकूळ घालत आहेत. तर गोलंदाजीत रसेलसह मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा फलंदाजांना नाकीनऊ आणत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरच्या खेळाडूला ‘ही’ चूक पडली महागात, BCCI ने ठोठावला दंड; जाणून घ्या
रोमहर्षक सामन्यात केकेआरचा मुंबईवर 18 धावांनी विजय, हर्षित राणा ठरला विजयाचा हिरो